आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमृत महोत्सव:जाजू एज्युकेशन संस्थेत आजादी का अमृत महोत्सव

यवतमाळ4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हरिकिसन जाजू संस्थेच्या वतीने ७५ वा आजादी का अमृत महोत्सव साजरा करण्यात आला. संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन जाजू इंटरनॅशनल स्कूलच्या परिसरात करण्यात आले.

सर्वप्रथम सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर प्रकाश जाजू, आशिष जाजू, संस्थेचे उपाध्यक्ष सुरेंद्र कसाट, किशोर जाजू, दर्शन जाजू, शिल्पा जाजू तसेच आयएमए अध्यक्ष डॉ. रत्नपारखी, आयडीए अध्यक्ष डॉ. पुनसे, सीएमसीएस प्राचार्य रितेश चांडक, जेजेसी प्राचार्य सुधीर वेलुकर, जेम्स सेकंडरीचे प्राचार्य सतीश उपरे, जेम्स प्रायमरीच्या प्राचार्या रिता देशमुख, डब्ल्यू. के. एम. संचालिका अवनी रायचुरा यांच्या हस्ते तिरंगा फडकवण्यात आला व सोबतच सर्व विद्यार्थी व पालकांच्या उपस्थितीत राष्ट्रगीत म्हणण्यात आले. त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. सरतेशेवटी वंदे मातरम या राष्ट्रीय गीताने संपूर्ण कार्यक्रमाची सांगता झाली. हरीकिसन जाजू संस्थेचे सर्व प्रमुख, प्राचार्य, उपप्राचार्य, समन्वयक तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या कार्यक्रमास उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...