आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकामगारांसाठी यवतमाळ जिल्ह्यात एकही घरकुल आजपर्यंत मंजूर झाले नसल्याचे निवेदन डॉ. विष्णू उकंडे यांनी दिले होते. त्या निवेदनाची दखल कामगार राज्यमंत्री बच्चू कडू यांनी घेऊन तात्काळ कामगार अधिकाऱ्यांची मंत्रालयात बैठक बोलावली. महाराष्ट्र शासनाच्या इमारत व ईतर बांधकाम कल्याणकारी मंडळ मुंबईच्या वतीने कामगारांसाठी घरकुल योजना मंजुर आहे. परंतु अधिकाऱ्याच्या उदासीनतेमुळे यवतमाळ जिल्ह्यात एकही घरकुल आजपर्यंत मंजुर करण्यात आले नसुन आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील एका ही कामगाराला लाभ देण्यात आला नाही. त्यासाठी अमरावती येथे डॉ. विष्णू उकंडे यांनी कामगार राज्यमंत्री नामदार बच्चू कडु यांची भेट घेऊन यवतमाळ जिल्ह्यातील बांधकाम कामगारांना तात्काळ घरकुल योजनेचा लाभ द्यावा, प्रलंबित असलेली बांधकाम कामगारांच्या पाल्यांची शिष्यवृत्ती प्रकरणे त्वरित मंजुर करण्यात यावे, कोरोना काळात अनेक कामगारांचा मुत्यू झाला त्यांच्या वारसास कामगार विभागाच्या वतीने देण्यात येणाऱ्या सानुग्रह अनुदानाचे त्वरित वितरण करण्यात यावे यासह अनेक प्रलंबित क्लेम प्रकरणे त्वरित निकाली काढण्यात यावी या आशयाचे निवेदन डॉ. विष्णू उकंडे यांनी दिले. त्यावर ना. बच्चू कडू यांनी तात्काळ महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार मंडळ मुंबई येथील अधिकाऱ्यांची बैठक मंत्रालय मुंबई येथे बोलवली व तात्काळ समस्या सोडवण्या संदर्भात आश्वासन दिले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.