आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेत्रदीपक नृत्य सादर:बलभीम नृत्याने श्री हनुमान‎ जन्मोत्सवाची यशस्वी सांगता‎

यवतमाळ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

‎हनुमान आखाडा चौकातील‎ हनुमान मंदिर संस्थानद्वारा‎ आयोजित श्री हनुमान जन्मोत्सव‎ सोहळा ३ ते ६ एप्रिल दरम्यान‎ विविध उपक्रमांनी पार पडला. दि.‎ ६ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता‎ नूपूर नृत्यनिकेतन नागपूरद्वारा‎ बलभीम नृत्य आराधना हा आगळा‎ वेगळा नृत्याविष्कार सादर‎ करण्यात आला.‎आतापर्यंत कथ्थक नृत्य,‎ नेत्राभिनय, मुद्राभिनय व आंगिक‎ अभिनय यावर दाक्षिणात्य‎ कलावंतांचेच प्रभुत्व आहे, असे‎ आपण समजत होतो. परंतु, नूपूर‎ निकेतनच्या कलावंतांनी‎ महाराष्ट्रीयन संताच्या अभंगावर‎ नऊ रस व विविधांगी अभिनयात‎ नेत्रदीपक नृत्य सादर करुन एक‎ नवा आयाम प्रस्थापित केला.‎

नृत्यानिकेतनच्या मार्गदर्शक, गुरु,‎ सुचना बंगाले, ढगे, संतोष बागडे,‎ साक्षी गायधने, माही सांबरे, या‎ हरहुन्नरी कलावंतांनी गणेश‎ स्तवन, देवी स्तवन, रामकथा,‎ रामजन्मोत्सव, हनुमान चालीसा,‎ सीता आक्रोश राम रावण युध्द-‎ रावण वध, दत्त आराधना, विठु‎ माऊली, विश्वरुपाय धीमाही,‎ अबिर गुलाल या संताच्या‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ अभंगावर नृत्याविष्कार सादर‎ करुन श्रोत्यांची वाहवा मिळविली.‎ या दैवी कलावंताचे स्वागत विवेक‎ मुराई, रिया रितेश राय, पूजा गोविंद‎ यादव, रंजिता मनीष अहीर यांनी‎ केले.‎ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन‎ ज्ञानेश्वर सुरजुसे यांनी केले.

दिप‎ प्रज्वलन अशोक सिंघानिया, रुपम‎ राय, संजय मुराई, रोषण यादव,‎ विजय दैवीकर, सचिन देशमुख,‎ रमेश जयस्वाल, मनीष अहिर यांचे‎ हस्ते करण्यात आले. आरतीचे‎ यजमान पद ईश्वर राय,‎ वासुदेवराव बाविस्कर, गोविंद‎ यादव, नंदकुमार बदनोरे, सुभाष‎ यादव, दीपक ठाकूर, विलास‎ देशपांडे, जगदीश मुराई तथा राम‎ आरतीचे यजमान पद महिला‎ मंडळानी भुषवले.‎