आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पटवारी संघ:विदर्भ पटवारी संघाच्या केंद्रीय अध्यक्षपदी बाळकृष्ण गाढवे तर सरचिटणीस पदी संजय अनवाणे

दारव्हाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कार्यालयीन कामापासून, संघटनेच्या विविध कामाच्या माध्यमातून प्रगती करीत पुन्हा बाळकृष्ण गाढवे यांची विदर्भ पटवारी संघ नागपूरच्या केंद्रीय अध्यक्षपदी अविरोध फेरनिवड झाली आहे. विदर्भ पटवारी संघ नागपूरची केंद्रीय वार्षिक आमसभा वेदीला लोन मेहकर येथे पार पडली. या आमसभेत बाळकृष्ण गाढवे यांची केंद्रीय अध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली तसेच सरचिटणीस पदी संजय अनवाणे, उपाध्यक्षपदी प्रकाश सुर्वे, सहसचिव गजानन भागवत, कोषाध्यक्ष विजय बोराखडे यांची ही निवड करण्यात आली आहे. या सभेमध्ये तलाठी, मंडळ अधिकारी संवर्गाचे अडीअडचणी बाबत विचारविनिमय करून त्या सोडवण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्यात आले. त्यावेळी यवतमाळसह विदर्भातील पटवारी संघाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...