आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्यांना सन्मान निधी‎:बँक खाते आधार संलग्न सुविधा आता गावातच!

यवतमाळ‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रधानमंत्री किसान सन्माननिधी’‎ योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांना सन्मान निधी‎ वितरीत केल्या जातो. या योजनेचा लाभ‎ घेण्यासाठी लाभार्थ्यांचे बँक खाते आधार‎ क्रमांकास जोडणे आवश्यक आहे.यासाठी‎ पोस्ट विभागाने पोस्टमनच्या माध्यमातून‎ गावातच सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी‎ विशेष मोहिम राबवण्यात येत आहे. या‎ मोहिमेचा ग्रामीण भागातील लाभार्थ्यांनी‎ लाभ घ्यावा, असे आवाहन पोस्‍ट‎ विभागाच्या वतीने केले आहे.‎ प्रधानमंत्री किसान सन्मान निधी‎ योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांना तीन हप्त्यात २ ‎ ‎ हजार रुपये प्रमाणे वर्षाला ६ हजार रुपये‎ मानधन देण्यात येते. या योजनेचा तेरावा‎ हप्ता जमा करण्याची कार्यवाही सुरु झाली ‎ ‎ आहे.

सोपी आणि सुलभ प्रक्रिया‎ याकरीता इंडिया पोस्ट पेमेंट बँक‎ कार्यालयास गावनिहाय याद्या उपलब्ध‎ करून देण्यात आल्या असून गावातील‎ पोस्टमास्तर लाभार्थ्यांना संपर्क करून‎ इंडिया पोस्ट पेमेंट बँकमध्ये खाती उघडून‎ देतील.आधार कोणत्याही अतिरिक्त‎ कागदपत्रांशिवाय करता येणार असल्याने‎ अत्यंत सोपी आणि सुलभ आहे.‎

बातम्या आणखी आहेत...