आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जल्लोष:दहा दिवसांच्या मुक्कामानंतर बाप्पाचे विसर्जन ; पुसद येथे विसर्जन मिरवणूक शांततेत

पुसद24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बाप्पा चालले गावाला चैन पडेना आम्हाला! देवा चुकले आमचे काही त्याची क्षमा असावी,’ असे म्हणत दहा दिवसांच्या लाडक्या बापाला पुसद येथे निरोप देण्यात आला. दोन वर्षांनंतर निर्बंध मुक्त मिरवणुका पुसद शहरातुन निघाल्या होत्या. गुलाल उधळ निघालेल्या गणेश मंडळाचे देखावे पाहण्यासाठी भक्तामध्ये एकच जल्लोषाचे वातावरण पाहावयास मिळाले होते. विसर्जन सोहळा दिवसभर पाहण्यासाठी संपूर्ण तालुक्यातील भक्तांनी व नागरिकांनी अलोट गर्दी केली होती. विसर्जन मिरवणुकीवर प्रशासनाची करडी नजर होती.पोलीस प्रशासन देखील सज्ज व तैनात होते. गणेश विसर्जना वेळी पोलिसांचा प्रत्येक चौकामध्ये वॉच होता. गणपती विसर्जनात निघालेल्या कॉमर्स अकॅडमीची विसर्जन रॅली पाहण्याजोगी होती.

विसर्जन मिरवणुकीमध्ये प्रत्येक गणेश मंडळांनी वेगळ्या पद्धतीने डोळ्याचे पारणे फेडणारे देखावे व नृत्य सादर केले होते. पुसदच्या राजाची मिरवणूक पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते. मानाचा गणपती म्हणून ओळखला जाणाऱ्या गणबादेव गणेश मंडळाची मिरवणूक पाहण्याजोगी होती.गेल्या दहा दिवस पुसदकरांनी गणरायाचा उत्साह पाहण्याजोगा उभा होता. बाप्पाच्या आगमनासाठी व विसर्जनासाठी देखील तीच गर्दी केली होती.विसर्जन मिरवणुकीमध्ये चिमुकले देखील नटून थटून आले होते. संपूर्ण तालुक्यातील गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या! निरोप देतो देवा आता आज्ञा असावी असे म्हणत घरगुती गणेशाचे देखील विसर्जन करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...