आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अटक:बारमधील गोळीबारातील मास्टर माइंडला अटक

यवतमाळ3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील एका बारमधील गोळीबार प्रकरण आणि आर्णी पोलिसांवर झालेल्या हल्ला प्रकरणातील मास्टर माईंडला अखेर एलसीबी पथक, आणि आर्णी पोलिसांनी ताब्यात घेतले. ही कारवाई गुरूवार, दि. २४ नोव्हेंबरला एलसीबी पथकाने पार पाडली असून रोहित जाधव रा. ब्राम्हणवाडा ता. आर्णी असे ताब्यात घेण्यात आलेल्या त्या मास्टर माईंडचे नाव आहे.

शहरातील छोटी जुगरी परिसरातील शिवनाथ बारमध्ये दारू बिलाच्या पैशातून वाद झाला होता. दरम्यान या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले असून रिव्हॉल्व्हरमधून बारमध्ये गोळीबार करण्यात आला होता. या प्रकरणातील मास्टर माईंड असलेला रोहित जाधव हा तेव्हापासून फरारच होता. त्याचा शोध एलसीबी पथकाकडून सुरू होता. अश्यातच दि. १५ नोव्हेंबरला रात्र गस्तीवर असलेल्या आर्णी पोलिसांना एक बेवारस दुचाकी आढळून आली होती.

यावेळी ती दुचाकी पोलिस कर्मचारी ठाण्यात घेवून जात असतांना एका नेक्सॉन कारमधून दोन युवक त्या ठिकाणी आले. त्यानंतर दुचाकी कसे का घेवून जात असल्याचे विचारत पोलिसांनाच ओळखपत्र मागितले. दरम्यान दुचाकीचे कुठलेही कागदपत्र सादर न करता कारमधील त्या दोघांनी पोलिसांना शिविगाळ केली. यातील शाहरूख खान याने पोलिसांना चक्क मारहाण केली. या प्रकरणी पोलिसांनी शाहरूख खान याला ताब्यात घेतले. मात्र दुसरा युवक हा पोलिसांच्या अंगावर भरधाव नेक्सॉन कार क्रमांक एमएच-२९-बीपी-७१७३ नेत पळ काढला. या प्रकरणी आर्णी पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हे नोंद करण्यात आले होते.

दरम्यान या प्रकरणाचे व्हिडीओ पोलिसांनी तपासले असता, कारमधील तो युवक रोहित जाधव असल्याचे समोर आले. तसेच घटनास्थळी असलेली ती नेक्सॉन कार अरविंद जाधव यांच्या नावावर असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. रोहित जाधव याची शोधमोहीम राबवली असता, तो आर्णी तालुक्यातील ब्राम्हणवाडा येथे लपून असल्याची माहिती मिळाली. त्यावरून गुरूवारी त्याला ताब्यात घेण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...