आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायवतमाळ तालुक्यातील कापरा पारधी बेड्यावरील ३०० कुटुंब गेल्या पन्नास वर्षांपासून मूलभूत सुविधेपासून वंचित आहे. त्यांना मूलभूत सुविधा मिळावी म्हणून गुरुदेव युवा संघाच्या वतीने आजपर्यंत थेट मुख्यमंत्री, राज्यपाल यांना तक्रारी, निवेदने देण्यात आले. गुरुदेव संघाच्या तक्रारीची दखल घेत थेट सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पांढरकवडा यांनी कापरा पारधी बेड्याला भेट देवून तेथील नागरिकांना आवश्यक त्या सुविधा लवकरात लवकर उपलब्ध करुन देण्यात येईल असे आश्वासन पांढरकवडा प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प तथा सहाय्यक जिल्हाधिकारी याशनी नागराजन यांनी दिले आहे.
येत्या काही दिवसातच या पारधी बेड्यावरील नागरिकांना जीवनावश्यक सुविधा उपलब्ध होणार असल्याचे दिसून येत आहे. यवतमाळ तालुक्यातील कापरा पारधी बेड्यावर सातशे लोकांची वस्ती असून येथील ३०० कुटुंब गेल्या पन्नास वर्षापासून उघड्यावर उदरनिर्वाह करीत आहे. त्यांनी आजपर्यंत कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेतला नाही ही बाब गुरुदेव युवा संघाच्या लक्षात येताच त्यांनी यवतमाळ जिल्हा प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केला. मात्र यवतमाळ जिल्हा प्रशासनाने कुठलीही दखल घेतली नाही. कापरा येथील फासे पारधी वेड्यावर मूलभूत सुविधा मिळाव्यात म्हणून गुरुदेव युवा संघाच्या वतीने मुंबई येथील मंत्रालयात जाऊन मुख्यमंत्री व राज्यपाल यांच्या दरबारी येथील फासे पारधी समाजातील बांधवांच्या व्यथा मांडल्या मुख्यमंत्री राज्यपाल यांनी निवेदनाची दखल घेत सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पांढरकवडा यांनी याबाबत स्वत: लक्ष घालून याबाबत योग्य ती कारवाई करण्यात यावी असे आदेश देण्यात आल्या.
त्यामुळे गेल्या पन्नास वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित असलेल्या पारधी समाज बांधवांना मूलभूत सुविधांचा लाभ मिळणार आहे. त्यामुळेच स्वत: सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पांढरकवडा या कापरा येथे जावून परिस्थितीची पाहणी केली. ज्या लाभार्थींचे नाव घरकुलच्या यादीत नाही अश्या लोकांना विशेष पारधी पॅकेज अंतर्गत घरकुल देण्यात येईल. तसेच जिल्हा परिषदेकडे सभागृहाचा व नाल्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता तो ही मंजूर झाला असून हे काम सुध्दा काही दिवसात चालू होईल असे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी याशनी नागराजन यांनी आश्वासन दिले. यावेळी याशनी नागराजन यांच्या समवेत मयुरेश गेडाम निरीक्षक, संग्राम पवार नियोजन अधिकारी, दिपक कांबळे निरिक्षक, प्रविण पवार आदि उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.