आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‎ हरकती व सूचना मागविल्या:बाजार समिती मतदार‎ यादीची सुनावणी 17 ला‎

अमरावती‎14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

धारणी व तिवसा कृषी उत्पन्न‎ बाजार समितीच्या मतदार‎ यादीवरील सुनावणी आगामी १७‎ मार्चला केली जाणार आहे. या‎ दोन्ही कृषी उत्पन्न बाजार‎ समित्यांची मतदार यादी गेल्या‎ आठवड्यात घोषित करण्यात‎ आली असून त्यावर सध्या‎ हरकती व सूचना मागविण्यात‎ आल्या आहेत. दररोज सकाळी‎ ११ ते ३ या वेळात या हरकती व‎ सूचना जिल्हा उपनिबंधक‎ कार्यालयात स्वीकारल्या जात‎ आहेत. यावरील सुनावणी‎ आटोपल्यानंतर २० मार्च रोजी‎ दोन्ही कृषी उत्पन्न बाजार‎ समित्यांची अंतिम मतदार यादी‎ घोषित केली जाणार असल्याचे‎ सहकार विभागाने कळविले आहे.‎

बातम्या आणखी आहेत...