आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा पोलिस शिपाई पदाच्या भरतीला पाच दिवसांपूर्वी प्रारंभ झाला. ३०२ जागांसाठी २६ ३८५ उमेदवारांनी अर्ज सादर केला असून यात १२५ तरुणी आहे. शिपाई होण्यासाठी फक्त १२ वी पासची अट असली तरी १२१५ बी एस्सी उमेदवारासह बीई, बी टेक, एलएलबी, बी टेक अॅग्री, बी फार्म, बीएसएलएलबी पास उमेदवार स्पर्धेत आहे. शहरातील पोलिस कवायत मैदानावर सोमवार, दि. २ जानेवारीपासून पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड, अपर अधीक्षक पीयूष जगताप यांच्या नियंत्रणात प्रत्यक्ष मैदानी चाचणी सुरू झाली.
यंदा पारदर्शक प्रक्रियेसाठी उमेदवारांची नोंदणी बायोमेट्रिक स्कॅनने होत आहे. आरएफआयडी प्रणालीने उमेदवारांना चेस्ट क्रमांकावर बारकोड दिला जात आहे. त्यावरून त्यांची १००, १६०० मीटर धावण्याचा अचूक वेळ नोंदवून गुणांकन केले जात आहे. सहायक पोलिस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पुजलवार, कऱ्हाळे, पाडवी, पोलिस निरीक्षक, सहायक पोलिस निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक, संपूर्ण पोलिस स्टाफ, फोटो ग्राफर, मंत्रालयीन, कार्यालयीन स्टाफ यासाठी कार्यरत असून संपूर्ण परिसरावर सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत.
शुक्रवारी ५९२ उमेदवारांनी दिली चाचणी
पोलिस भरतीच्या पाचव्या दिवशी शुक्रवार, दि. ६ जानेवारीला ८३५ उमेदवारांना बोलावण्यात आले होते. त्यापैकी ५९२ उमेदवार मैदानावर हजर झाले होते. यावेळी उंची, छाती, व कागदपत्रांमध्ये ७३ उमेदवार अपात्र ठरले असून २९४ उमेदवार प्रत्यक्ष मैदानी चाचणीत पास झाले. तर २४३ उमेदवार गैरहजर होते. गेल्या पाच दिवसात २ हजार ७८८ उमेदवारांनी मैदानी चाचणी दिली असून त्यापैकी १ हजार ४८४ उमेदवार पास झाले. पोलिस भरती स्पर्धेतील उमेदवारबी एस्सी - १२१५, बी टेक - २१, एलएलबी - ८, बी टेक अँग्री - ४, बीएस्सीएलएलबी - १, बीई - १६३, बी-फार्म - २२
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.