आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:युवकाला मारहाण; 2 पोलिसांची‎ मुख्यालयात केली रवानगी‎

पुसद‎8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील खंडाळा पोलिस स्टेशन हद्दीतील‎ शेंबाळपिंप्री येथे धूलिवंदनाच्या दिवशी दोन युवक‎ शेताकडे जात होते. अशात ठाणेदार बालाजी‎ शेंगेपल्लू, पोलिस कर्मचारी संदेश पवार,‎ उदयराज शुक्ला यांनी त्या युवकांना मारहाण‎ केली. याची तक्रार जखमी महेश सुरोशे यांनी थेट‎ गृहमंत्रालय, मानवाधिकार आयोग, जिल्हा‎ पोलिस अधीक्षकांसह पुसद उपविभागीय पोलिस‎ अधिकाऱ्यांकडे केली. त्यावरून दोन्ही‎ पोलिसांची तडकाफडकी मुख्यालयात रवानगी‎ करण्यात आली.‎ खंडाळा ठाण्याचे पो कॉ. संदेश पवार,‎ उदयराज शुक्ला अशी मुख्यालयात रवानगी‎ केलेल्यांची नावे आहेत.

दरम्यान, प्रकरणाचे‎ गांभीर्य ओळखून जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.‎ पवन बनसोड यांनी पुसदचे सहायक जिल्हा‎ पोलिस अधीक्षक तथा उपविभागीय पोलिस‎ अधिकारी पंकज अतुलकर यांना चौकशी‎ करण्याचे आदेश दिले आहे. शेंबाळपिंप्री येथे ७‎ मार्च रोजी रंगपंचमीच्या दिवशी काही तरुण दारू‎ पिऊन विनाकारण धिंगाणा घालत होते. ही‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ माहिती खंडाळा पोलिस स्टेशनचे सपोनि‎ बालाजी शेंगेपल्लू यांना मिळाली होती. त्यांनी‎ पोलिस कर्मचाऱ्यांना घेऊन शेंबाळपिंप्री गाठली.‎ तेथे धिंगाणा घालणाऱ्यांना पोलिसांनी समज‎ दिली. त्यानंतर शेताकडे निघालेल्या दोन‎ युवकांना पोलिसांनी मारहाण केली. या‎ मारहाणीत जखमी झालेल्या महेश सुरोशेच्या‎ तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली.‎

युवकाला बोटसुद्धा लावले नाही‎ रंगपंचमीच्या दिवशी काही युवक जातीय तेढ‎ निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते.याबाबत‎ पोलिसांना माहिती मिळाली असता लगेच‎ पोलिस कर्मचाऱ्यांसह गाव गाठले.त्यावेळी‎ युवकांनी घटनास्थळावरून पळ काढला.तत्पूर्व‎ ीच हाणामारीची घटना घडली होती.त्या घटनेत‎ एक युवक गंभीर जखमी झाला होता.दारूच्या‎ नशेतील युवक पडल्याचे आम्ही बघितले.यात ते‎ गंभीर जखमीसुद्धा झाले होते.त्या तरुणाला बोट‎ देखील लावले नाही. त्यांनी विनाकारण तक्रार‎ केली आहे.‎ - बालाजी शेंगेपल्लू, सपोनि,खंडाळा.‎

बातम्या आणखी आहेत...