आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यात अनेक ठिकाणी ग्रामसेवकांवर हल्ला झाला. तसेच उलटपक्षी ग्रामसेवकांवर खोटे गुन्हे दाखल झाल्याच्या निषेधार्थ जिल्हा ग्रामसेवक युनियन द्वारे मंगळवार, दि. १० मे पासून असहकार आंदोलनाला सुरवात केली आहे.
गेल्या काही दिवसात मारेगाव तालुक्यात किशोर खरात, पुसद तालुक्यात जी. जी. मोरे, घाटंजी तालुक्यात महेश मंचलवार या ग्रामसेवकांना मारहाण झाली. यातील आरोपींना त्वरीत अटक करून त्यांच्याविरूद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामसेवक युनियनने केली आहे. तसेच ग्रामसेवकांविरूद्ध दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याचीही मागणी केली. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच मंगळवारी गटविकास अधिकारी यांना यासंबंधीचे निवेदन देण्यात आले. प्रशासनाने त्वरीत अटक करून कारवाईची ग्वाही दिली.
मात्र अद्यापही अटक न झाल्यामुळे ग्रामसेवक युनियनने मंगळवारपासून असहकार आंदोलनाची हाक दिली आहे. यानंतरही आरोपींना अटक न झाल्यास १७ मे पासून बेमुदत कामबंदचा इशारा निवेदनातून देण्यात आला. यावेळी ग्रामसेवक सत्यपाल घाटे, रेखा मडावी, प्रिया मेंढे, एस. ए. महल्ले, कोमल कारेकर, चंदा गाडेकर, पी. डी. भगत, उल्हास ठाकूर, राजेश वानरे, आदी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.