आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुकानदार-ग्राहक वाद:सर्व्हर डाऊनमुळे पॉस मशीन बंद पडल्याने दुकानाबाहेर लाभार्थ्यांची गर्दी झाली .‎

शेंदुरजनाघाट‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्याच्या अन्नधान्य वितरण विभागाचे‎ सर्व्हर डाऊन झाल्याने रेशन दुकानांतील‎ पॉस मशीन वारंवार डिस्कनेक्ट होत असून, ‎ ‎ वरुड तालुक्यातील ग्राहक संतापले आहेत.‎ तर दुसरीकडे रोजच्या या कटकटीला ‎ दुकानदारही कंटाळले असून, ग्राहकांसोबत ‎ त्यांचे वादविवाद सुरु आहे.‎ सर्व्हर आणि पॉस मशीनच्या या‎ अडथळ्यामुळे कधी दुकानदारासोबत वाद,‎ तर कधी सरकारी यंञणेला शिविगाळ हे‎ आता नित्याचेच होऊन बसले आहे.

काही‎ कार्डधारकांच्या मते रेशन दुकानदार त्यांना‎ अपमानजनक वागणूक देतात. रेशनचा‎ पुरवठा आणि दिवाळी भेटीदाखल स्वस्तात‎ मिळणारा ‘आनंदाचा शिधा’ याबाबत ते‎ योग्य माहिती देत नाहीत. फार जोर देऊन‎ विचारल्यास आमच्याशी वाद घालतात.‎ त्यामुळे नको ते धान्य आणि नको तो‎ आनंदाचा शिधा, असे म्हणायची वेळ‎ आली आहे.‎ दुसरीकडे दुकानदारांच्या मते ही तांत्रिक‎ अडचण असली तरी ती समजून घेण्याची‎ कोणाचीही तयारी नाही. लाभार्थी थेट वाद‎ घालतात.

कधी-कधी तर हा वाद‎ विकोपाला जाऊन मारामारीपर्यतची‎ घटनाही घडली आहे. त्यामुळे शासनाने‎ आपली यंत्रणा दुरुस्त करुन आम्हाला‎ न्याय द्यावा. नाहितर उगाच‎ दुकानदार-ग्राहक वाद असे नित्याचेच‎ प्रकार होऊन बसेल. त्याचे गंभीर परिणाम‎ दुकानदार आणि ग्राहक अशा दोन्ही‎ घटकांना भोगावे लागतील.‎ दरम्यान, याबाबत अधिकाऱ्यांशी संपर्क‎ साधला असता ते म्हणतात, थोडा वेळ‎ थांबा, सर्व्हर सुरु होईल आणि सर्व्हर सुरु‎ झाले की पॉस मशीन आपोआपच‎ कार्यान्वित होतील.दुकानदारांच्या मते‎ असे होतेही. परंतु सर्व्हर सुरु झाल्यानंतरही‎ तासनतास मशीन सुरु होतच नाही आणि‎ झालीच तर बोटांचे ठसे (फिंगर)‎ ओळखत नाही, अशी स्थिती आहे.‎

अधिक चौकशी केली असता बंगळुरुच्या‎ एनआईसीमधील तांञिक बिघाडामुळे‎ स्वस्त धान्य दुकानातील पाँसमशीन‎ तासनतास काम करीत नाहीत. याच‎ दोषामुळे लाभार्थ्यांचे ठसेही ओळखले‎ जात नाही. बऱ्याच प्रयत्नानंतर ही प्रक्रिया‎ पूर्ण झाली तर शेवटचा टप्पा म्हणजे‎ मशीनमधून पावती बाहेर निघत नाही.‎ परिणामी लाभार्थ्यांना तासनतास‎ एकसारखे रांगेत उभे रहावे लागते. त्यामुळे‎ एनआयसी बंगळुरुवर कठोर कारवाई का‎ करीत नाही, असा लाभार्थ्यांचा सवाल‎ आहे. वारंवार सर्व्हर डाऊन असेच राहिले‎ तर या पॉस मशीनमुळे पुन्हा वादविवाद‎ होण्याची भीतीही वाढली आहे.‎

बातम्या आणखी आहेत...