आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरस्कार वितरण सोहळा:विद्यार्थ्यांसाठी कार्य करणाऱ्या लोकमित्र ट्रस्ट ला सर्वोत्कृष्ट सहयोगी संस्था पुरस्कार

यवतमाळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

लोकमित्र ट्रस्ट फॉर ह्युमन डेव्हलपमेंट या संस्थेच्या वतीने ग्रामपंचायत कापरा येथील पारधी बेडा मधील शिक्षणापासून दुर्लक्षित राहात असणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी रूची निर्माण करण्याच्या हेतुने तसेच मुलामध्ये खेळीमेळीच्या वातावरणात शिक्षण प्रदान करणे, महिलांचे साक्षरता वर्ग चालविणे, कुपोषण, गरोदर माता, महिला आणि मुलांच्या शैक्षणिक आणि आरोग्याच्या दृष्टीने विविध नाविन्यपूर्ण उपक्रम या संस्थेच्या वतीने राबवले जातात. ह्या कामासाठी मुंबईच्या नामांकित अशा वि चेंज संस्थेकडून लोकमित्र ट्रस्टला पुरस्कार प्रदान करण्यात आला. सदर पुरस्कार हा मुंबई येथील ठाणे च्या काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात मोठ्या थाटात पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.

या वर्षीचा सर्वोत्कृष्ट सहयोगी संस्था पुरस्कार स्वीकारण्यासाठी लोकमित्र ट्रस्टच्या वतीने संस्थापक मिलिंद वंजारी, सहा. प्रा. रत्नदीप गंगाळे, सचिन रंगे आणि मोहित कुमार यांनी प्रत्यक्षात मुंबई येथे जाऊन हा पुरस्कार स्विकारला. हा पुरस्कार ठाण्याचे माजी मेयर हेमंत पवार, वुई चेंज संस्थेचे अध्यक्ष श्रीधर लोकनाथान, संपदा इनारकर, गणेश रमण आणि कृष्णा गंगवानी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. तसेच कार्यक्रम स्थळी लोकमित्र ट्रस्टच्या कामावर आधारित माहितीपटाचे पहिल्यांदा अनावरणार करण्यात आले. कमी कालावधी मध्ये पुरस्कार प्राप्त करणारी लोकमित्र ट्रस्ट ही पहिली सामाजिक संस्था आहे आणि जिल्ह्यातील अति दुर्बल घटक असणाऱ्या पारधी समाजासाठी त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी लोकमित्र ट्रस्ट ही संस्था काम करते ते इतरांना प्रेरणा देणारे कार्य आहे असे प्रतिपादन व गौरव उदगार हेमंत पवार यांनी काढले. लोकमित्र ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष, मिलिंद वंजारी, ट्रस्टचे सदस्य प्राध्यापक रत्नदीप गंगाळे, मोहित कुमार, प्रतिष्ठा काळे, सचिन रंगे प्रकाश बहादे, सचिन बारडे, सोनाली वंजारी, यांच्या पुढाकाराने मागील वर्षापासून कोविड काळात पारधी पोड हे गाव दत्तक म्हणून निवड केली आणि या ठिकाणी विविध सामाजिक उपक्रम सातत्याने राबवत असतात तसेच ह्या मिळालेल्या सन्मानाबद्दल अनेकांचे यशस्वी हात त्याचे श्रेय पारधी गावातील समस्त गावकरी आणि संस्थेसाठी काम करणाऱ्या व्यक्तीसाठी हा पुरस्कार त्यांना सर्वांना समर्पित आहे. अशी भावना संस्थेच्या पदाधिकारी यांनी व्यक्त केले.

बातम्या आणखी आहेत...