आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराचिंचवाडी (निंगनूर) येथे सुरू असलेल्या भागवत कथा व अखंड हरिनाम सप्ताहादरम्यान भाविक भक्तांनी निंगनूर येथे स्वच्छता अभियान राबवले. भागवताचार्य हभप पवन महाराज खोडे तसेच ज्ञानेश्वरी पारायण हभप दिगंबर महाराज खुपसे यांच्या सुश्राव्य संगीतमय प्रवचनात २८ जानेवारी ते ४ फेब्रुवारी अखंड हरिनाम सप्ताहा दरम्यान दररोज नामवंत कीर्तनकारांचे कीर्तन, भजन व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
हभप गजानन महाराज मस्के, गजानन महाराज डोळंबा, यादव महाराज टारपे हर्षीक, नम्रता काळे यांच्या श्रवणीय कीर्तनाचा परिसरातील भाविकांनी लाभ घेतला आहे. तर १ फेब्रुवारी बाळू महाराज ठाके, शिवा महाराज शिवनीकर पवन महाराज डे यांचे कीर्तन होणार आहे. मारोतराव पंडागळे यांच्या तर्फे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या भक्तिरसाच्या सोहळ्यात मृदंगाचार्य गणेश महाराज भानुसे, गायनाचार्य साहेबराव महाराज, गजानन मस्के, भारूडाचार्य रत्नमाला डफडे चिरंगवाडी यांनी सहभाग नोंदवला.
यादरम्यान निंगनुर येथे भाविकांकडून स्वच्छता अभियान राबवण्यात आले. यादरम्यान बाबर मित्र व बजरंग दल मंडळाच्या वतीने स्वच्छता दूतांना चहा व फराळाची व्यवस्था करण्यात आली. सप्ताहादरम्यान परिसरात भाविकांची मांदियाळी असून, या सप्ताहाचा भाविक-भक्तांनी बहुसंख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.