आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरस्कार‎:‘शेतकऱ्यांना कृषी संजीवनी मिळण्यासाठी भाईजी प्रयत्नशील’‎

बुलडाणा‎24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कृषी संजीवनी‎ मिळावी व ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा‎ विकास व्हावा यासाठी राधेश्याम चांडक‎ उपाख्य भाईजी हे सातत्याने प्रयत्नशील‎ असतात, असे प्रतिपादन पद्मश्री पुरस्कार‎ प्राप्त राहीबाई सोमा पोपेरे यांनी केले. त्या‎ शनिवार, दि.५ मार्च रोजी डोंगरखंडाळा‎ येथील सहकार विद्या मंदिर प्रांगणात‎ शेतकऱ्यांना आयोजित कार्यक्रमात बोलत‎ होत्या.‎ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बुलडाणा‎ अर्बनचे अध्यक्ष राधेशाम चांडक, हवामान‎ तज्ञ पंजाबराव डख हे उपस्थित होते.‎ शेतकरी मागील काही वर्षापासून शेतकरी‎ सातत्याने येणाऱ्या संकटामुळे हताश झाला‎ आहे. शेतीतले उत्पन्न कमी होत चालले‎ आहे.

रासायनिक खताच्या किंमती वाढत‎ असल्याने शेतकरी कर्जबाजारी होत आहे.‎ त्यातूनच शेतकरी निराशाग्रस्त होऊन‎ आत्महत्येकडे वळत आहे. जिल्ह्यातील‎ आत्महत्या थांबाव्या यासाठी राधेश्याम‎ चांडक हे सातत्याने प्रयत्नशील असतात.‎ अहमदनगर येथील राहीबाई पोपेरे यांनी कृषी‎ क्षेत्रामध्ये क्रांती घडवली आहे. त्यांच्या या‎ योगदानाबद्दल शासनाच्या वतीने त्यांना‎ राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पद्मश्री‎ पुरस्कार प्रदान करण्यात आला.

भाईजी‎ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राहीबाईचे‎ मार्गदर्शन मिळण्यासाठी प्रयत्नशील होते.‎ जिल्ह्यात हवामानावर आधारित शेती‎ करण्याचे तंत्र व पारंपारिक बियाण्यांच्या‎ वाणाच्या संरक्षक संवर्धक विषयावर‎ मार्गदर्शन मिळावे, यासाठी त्यांनी‎ कार्यक्रमाचे आयोजन डोंगरखंडाळा येथे‎ केले. कार्यक्रमात राहीबाईंनी शेतकऱ्यांना‎ मार्गदर्शन करत पारंपारिक शेती तंत्रज्ञान‎‎‎‎‎‎‎‎‎ बियाण्याचे वाण आदी विषयावर सखोल‎ मार्गदर्शन केले. आधुनिक शेतीमध्ये‎ रासायनिक खताचा मोठ्या प्रमाणात वापर‎ केला जातो आहे. परिणामी शेतीचा पोत‎ घसरत चालला आहे. त्याचा मानवी‎ जीवनावर देखील दुष्परिणाम होत‎ असल्याचे अनेक संदर्भ राहीबाई यांनी‎ दिले. तर हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी‎ हवामानावर आधारित शेती करावे असे‎ सुचविले. प्रास्ताविक राधेश्याम चांडक‎ उपाख्य भाईजी यांनी केले. संचालन व‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ मार्गदर्शन करताना राहीबाई सोमा पोपेरे .‎

बातम्या आणखी आहेत...