आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भूमिपजन:श्रीरामपूर ग्रामपंचायतीच्या हद्दीतील पुलाच्या बांधकामाचे भूमिपजन

पुसद7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीरामपूर ग्रामपंचायतीच्या हद्दीत येत असलेल्या बंजारा हिल येथे २५१५ ग्रामीण विकास योजने अंतर्गत नाल्यावर २० लाख रुपये खर्च करून पुलाचे बांधकाम केले जाणार आहे. त्याच्या भूमिपूजन सोहळा विधान परिषद सदस्य डॉ. वजाहत मिर्झा, लोकनेते आमदार इंद्रनील मनोहरराव नाईक, प्रदेश काँग्रेस कमिटी सचिव डॉ. मोहम्मद नदीम व पुसद अर्बन बँकेचे अध्यक्ष शरद मैंद, श्रीरामपूर सरपंच आशिष काळबांडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता प्रकाश झळके यांच्या हस्ते नुकताच करण्यात आला.

भुमी पुजन सोहळ्यात काँग्रेस कमिटीचे जिल्हा महासचिव सय्यद इश्तियाक भाई, माजी नगरसेवक अजय पुरोहित, अशोक बाबा ऊंटवाल, धनकेश्वर सरपंच सादिक भाई, श्रीरामपूर सदस्य सचिन भीतडे, राहुल सहारे, जलील भाई बागवान, रूपाली इंगोले, तनुजा विशाल पवार, तहेसीन पहलवान, कय्यूम भाई ताज भाई, बबलू भाई, अमजद खान,अमजद बिल्डर,आसिफ खान, शेख जिया, फरीद भाई, अमजद खान, युनुस भाई ठेकेदार अशफाक भाई ठेकेदार, शाहिद मिर्जा, अरशद भाई, वसीम भाई, जुनेद भाई तथा प्रतिष्ठित गावकरी मंडळी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...