आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भूमिपूजन‎:फुलवाडी येथे विकास कामाचे भूमिपूजन‎

पुसदएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

ग्रामपंचायत फुलवाडी येथील दलित वस्ती‎ सिमेंट रोडच्या भूमिपूजन समारंभ १५ डिसेंबरला‎ आमदार इंद्रनील नाईक यांच्या हस्ते करण्यात‎ आले. या प्रसंगी प्रास्ताविक करताना राजेंद्र‎ चव्हाण यांनी ग्राम पंचायत फुलवाडी येथील‎ मागील १८ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पणशिरा‎ पाजर तलाव, दलित वस्तीत अंतर्गत गटार योजना,‎ पशुसंवर्धन दवाखाना दुरुस्ती व युवकांकरिता‎ अभ्यासिकासाठी अद्ययावत सभागृह इत्यादी‎ मागण्या करण्यात आल्या. तसेच ग्रामपंचायत‎ लोहरा (ई), लोहरा (खुर्द) व गोपवाडी येथील‎ समस्या सोडवण्याची मागणी सरपंच सुदाम चिरंगे‎ यांनी या प्रसंगी केली.

फुलवाडी, देवठाणा वाॅर्ड‎ क्रमांक ३ व लोहरा, जामनाईक व देवठाणा येथील‎ प्रश्न सोडवण्यात येतील, असे उपस्थित‎ नागरिकांना मार्गदर्शन करताना अश्वासन दिले.‎ अप्पासाहेब अत्रे विजाभज प्राथमिक व माध्यमिक‎ आश्रम शाळेतील कुस्तीपटूचे राज्य व विभागीय‎ शालेय कुस्ती स्पर्धेकरिता निवड झाल्याबद्दल‎ ग्रामपंचायत फुलवाडीचे वतीने आमदार इंद्रनील‎ नाईक यांचे हस्ते संचिता रवींद्र राठोड, साईश्वरी,‎ संतोष पवार व यश प्रकाश चव्हाण या विद्यार्थ्यांचा‎ सत्कार करण्यात आला. प्रसंगी फुलवाडीच्या‎ सरपंच, उपसरपंच, सचिव, ग्राम पंचायतच्या‎ सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे‎ सूत्रसंचालन गजानन पाचकोरे यांनी केले.‎

बातम्या आणखी आहेत...