आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाविक भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण:नाग मंदिराचे भूमिपूजन

दिग्रस5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिग्रस आर्णी मार्गावरील तूपटाकळी येथील नागोबा नाल्या जवळ मुख्य रस्त्याच्या कडेला जागृत नाग मंदिर आहे. मुख्य रस्त्याच्या कामामुळे मंदिराची उंची घटली. त्यामुळे आरएनएस इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी बेंगलोर पी. एम. देवराज यांनी मंदिराची उंची व सुशोभीकरण करण्याचा संकल्प केला. त्यानुसार नाग पंचमीच्या दिवशी या मंदिराचा जिर्णोद्धार व्हावा यासाठी माजी राज्यमंत्री संजय देशमुख यांच्या हस्ते भूमिपूजन केले. याप्रसंगी माजी राज्यमंत्री संजय देशमुख यांनी नाग मंदिराच्या बांधकामात माझे काही योगदान लागल्यास ते मी करण्यास तयार असल्याचे सांगून मंदिर पूर्ण होणार नाही तोपर्यंत मी सहकार्य करणार असल्याचे आश्वासन या प्रसंगी व्यक्त केले. यामुळे भाविक भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

दिग्रस आर्णी रस्त्यावरील नागमंदिर मुख्य रस्त्याच्या बांधकामामुळे मंदिर हे रस्त्याच्या खोलगट भागात गेल्याने मंदिरालागूनच पाणी वाहत असल्याने आरएनएस इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी बेंगलोर पी. एम. देवराज यांनी त्या मंदिराची शोभा पुन्हा यावी या उदात्त हेतूने मंदिराचे पुन्हा सुशोभितीकरण करण्याचे ठरविले. त्या अनुषंगाने नाग पंचमीच्या दिवशी या मंदिराच्या बांधकामाचे भूमिपूजन माजी राज्यमंत्री संजय देशमुख यांचे हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ओंकार खडलोया, राजू पाटील, कैलास खामकर, शिवकुमार चिस्तळकर, विवेक देशमुख, लक्ष्मण टेकाळे, संदीप चिस्तळकर, प्रमोद रोडे आदीसह गावकरी उपस्थित होते

बातम्या आणखी आहेत...