आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सामान्य प्रशासन:सामान्य प्रशासन उपमुख्य कार्यकारी अधिकारीपदी भोयर ; गटविकास अधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्या

यवतमाळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या दोन वर्षांपासून जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह यवतमाळ पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांचे पद रिक्त होते. दरम्यान, मंगळवार, २४ मे रोजी गटविकास अधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीतून दोन्ही ठिकाणी अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. तर जलजीवन मिशन प्रकल्प संचालक एम. टी. चौधर यांची नाशिक येथे सहाय्यक आयुक्त पदावर बढती झाली आहे. जिल्हा परिषदेचे तत्कालीन उपमुख्य कार्यकारी अधिकारी सी. जी. चव्हाण यांच्या बदलीनंतर नविन अधिकारी कुणीही आला नाही. तेव्हापासून उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा प्रभार इतर अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात येत होता. मागिल काही दिवसांपासून महिला व बालकल्याण अधिकारी प्रशांत थोरात यांच्याकडे प्रभार होता. अशात मंगळवार, दि. २४ मे रोजी गटविकास अधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांची पदोन्नती झाली. यात यवतमाळ जिल्हा परिषद सामान्य प्रशासनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदी वर्धा जिल्ह्यातील देवळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी पी. के. भोयर यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक मनोजकुमार चौधर यांची नाशिक येथे सहाय्यक आयुक्त पदावर बढती झाली. यवतमाळ जिल्हा परिषद नरेगाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद गुडधे यांची पंचायत विभागात समकक्ष पदावर नेमणूक झाली आहे. तर गेल्या काही दीड ते दोन वर्षांपासून यवतमाळ पंचायत समितीचे गटविकास अधिकाऱ्यांचे पद रिक्त होते. या ठिकाणच्या प्रभारांवरून बऱ्याचवेळा राजकीय वादंगसुद्धा उठले होते. या पदोन्नतीतून नांदेड जिल्ह्यातील हादगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी के. एल. गड्डापोड यांची यवतमाळ पंचायत समितीत समकक्ष पदावर नेमणूक करण्यात आली आहे. एकंदरीत गटविकास अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीतून दोन अधिकाऱ्यांची यवतमाळ बदली झाली, परंतू जिल्ह्यातील इतरही काही पंचायत समितीत गटविकास अधिकाऱ्यांचे पद रिक्त आहे. या ठिकाणचा कारभार प्रभारी सांभाळत आहे.

बातम्या आणखी आहेत...