आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भूमिपूजन:चिखली येथील मातोश्री पाणंद रस्त्याचे भूमिपूजन; तब्बल वीस वर्षानंतर रस्ता झाला मोकळा

राळेगाव17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

चिखली पारधीबेडा ते निधा या दोन किलोमीटरच्या मातोश्री पाणंद रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन शुक्रवार, दि. १० जून रोजी तहसीलदार डॉ. रवींद्र कानडजे व कॉन्ट्रॅक्टर राजू दूधपोळे यांच्या उपस्थितीत करण्यात आले असून या रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. यावेळी मंडळ अधिकारी गोटे, चिखली येथील(प्रभारी) मंडळ अधिकारी पोटे, चिखली येथील तलाठी भोयर, शेळी येथील नलू वैरागडे, ग्रामपंचायत सदस्य, सुरेंद्र भटकर, दीपक नगराळे, चरणदास भोसले आशिंदर पवार, सुभाष फुलमाळी, नामदेव उमाटे, राजू भोंगाडे, पवन पवार, पक्षा पवार उपस्थित होते.

चिखली पारधी बेडा ते निधा या शिव धुर्‍यावर आजूबाजूच्या बऱ्याच शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले होते. त्यामुळे या शिव पाणंद रस्त्याने शेतकऱ्यांना येण्या जाण्या करिता मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. याबाबत काही शेतकऱ्यांनी वारंवार लोकप्रतिनिधींना रस्ता करून देणे बाबत आग्रही केला होता अखेर वीस वर्षानंतर या शिव पाणंद रस्त्याच्या दोन किलोमीटरच्या कामाला मंजुरी मिळाली असू शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पाणंद रस्त्याने शेतकऱ्यांना अडचण असल्याने या मातोश्री पाणंद रस्त्याचे ठेकेदार राजू दुधपोळे यांनी या रस्त्याच्या कामाला लवकर सुरवात करून हे काम लवकर करून देण्यात येईल असे सांगितले असून शेतकऱ्यांनी ठेकेदार राजू दुधपोळे यांचे आभार मानले.

बातम्या आणखी आहेत...