आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:अज्ञात वाहनाच्या धडकेत‎ दुचाकीस्वार ठार‎

दिग्रस13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील लाख रायाजी फाट्याजवळ‎ एका दुचाकी स्वारास अज्ञात वाहनाच्या जबर धडकेत‎ एक जण ठार झाल्याची घटना दि. ६ मार्च रोजी‎ रात्रीच्या सुमारास घडली. मृतक श्याम अशोक मोहाडे‎ वय -३० वर्ष रा. महागाव हा दुचाकीने लाख रायाजी‎ फाट्याकडून महागावकडे जात असतांना अज्ञात‎ वाहनाने दुचाकीला जबर धडक दिली. या धडकेत‎ दुचाकीस्वार रस्त्यावर जखमी अवस्थेत पडून होता.‎ घटनास्थळावरून जखमीला उपचारासाठी दिग्रस‎ ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी मृत‎ घोषित केले. मृतकाच्या पश्चात पत्नी,आई, मुलगा व‎ मुलगी असा आप्त परिवार आहे.‎

बातम्या आणखी आहेत...