आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरुण पिढीसमोर आदर्श:शंभर विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटप करून वाढदिवस साजरा

ढाणकी6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सद्या समाजात वाढदिवसानिमित्त मोठ मोठ्या पार्टीचे आयोजन करून श्रीमंतीचा बडेजाव पणाचे प्रदर्शन करण्यात येते. मात्र जिल्हा परीषद प्राथमिक शाळा ढाणकी येथे शिक्षण घेतलेल्या तरूणांनी त्याच शाळेत शिक्षण घेणाऱ्या शंभर विद्यार्थ्यांना वाढदिवसाचे औचित्य साधुन शैक्षणिक साहित्याचे वाटप करून एक नवा आदर्श ठेवला.

ढाणकी येथील मंगेश चौरे, आरएसएस संघटनेचा कार्यकर्ता रवि येकराळे यांचा बुधवार, दि. २७ जुलै रोजी जन्मदिवस होता. आपण ज्या समाजात लहानाचे मोठे झाले त्या समाजाचे आपणाला काही देण लागतं. या उदात्त हेतूने प्रेरीत होवून ढाणकी जि.प. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. या कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अनिल गोपाळा गायकवाड तर प्रमुख उपस्थितीत केंद्रप्रमुख रामदास केंद्रे, जिल्हा महासचिव जॉन्टी विणकरे, नगरसेवक उमेश योगेवार, सामाजीक कार्यकर्ता पंकज केशेवाड, मुख्याध्यापिका वनमाला जवळेकर, अरूणा इरलेवाड, सुरेखा विनकरे, गोकुळ राठोड, अविनाश केंद्रे उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...