आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निषेध:अजित पवारांविरोधात भाजप आक्रमक; जयघोष करीत निषेध

यवतमाळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यांचे सोमवारी शहरात संतप्त पडसाद उमटले. भाजप महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी दत्त चौकात एकत्र येत आंदोलन केले. आंदोलकांनी छत्रपती संभाजी महाराज यांचा जयघोष करीत अजित पवार यांचा निषेध केला.

अजित पवार यांच्या वक्तव्यावरून राजकीय गदारोळ सुरू झाला असून, सोमवारी भाजपा महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्ष माया शेरे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. राज्यात जातीय तेढ निर्माण करण्याकरता अजित पवार यांनी अपमान जनक वक्तव्य केले आहे असा आरोप करत माफी मागावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा जिल्हाध्यक्ष माया शेरे यांनी दिला.

यावेळी सरचिटणीस जयश्री राठोड, उपाध्यक्ष पूजा मून, पुष्पलता सप्रे, शहराध्यक्ष उषा खटे, माणिक पांडे, प्राजक्ता टिकले, भारती जाते, माधुरी धायरा, सुनिता मडावी, वैशाली लोळगे, शिल्पा मुत्तलवार, रेखा नंदुरकर, मंदा ननावरे, नीलिमा देशपांडे, नंदा जीरापुरे, साधना काळे, कोमल ताजने, सुषमा राऊत, लता ठोंबरे, लता केदार, वासंती धोपाटे, केतकी पोटे, अंजली राऊत, संगीता कासार, भारती दोडके, रंजना पाळेकर, साधना काळे, रंजना पोकळे, अर्चना गुरव, कविता, सारिका शेंडे, आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...