आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापाकिस्तानी परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावरुन भाजप आक्रमक झाली आहे. पाकिस्तानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री बिलावल भुट्टो यांच्याविरोधात भाजपने शनिवार, दि. १७ डिसेंबर रोजी बसस्थानक चौकात आंदोलन करीत भुट्टो यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात पाकिस्तानी विदेश मंत्री बिलावल भुट्टो याने खालच्या पातळीवर टीका केली. भुट्टो यांचे वक्तव्य पाकिस्तानची दिवाळखोरी दर्शवणारे आहे. पंतप्रधान मोदी यांचे स्वागत करण्यासाठी सर्वच देशाचे नागरिक आतुर असतात. जगाच्या नकाशावर भारताचे वजन वाढले आहे. यामुळेच पाकिस्तानचा जळफळाट होत आहे.
पाकीस्तानी परराष्ट्रमंत्री वक्तव्याने भाजप पदाधिकारी संतप्त झाले आहे. त्यांनी बसस्थानक चौकात भुट्टो यांच्या पुतळ्याचे दहन केले. यावेळी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार मदन येरावार, राजेंद्र डांगे, विजय कोटेचा, श्याम जयस्वाल, रेखा कोठेकर, माया शेरे, किशोर जोथवानी, राजु पडगीलवार, शंतनु शेटे, सुरज गुप्ता, आकाश धुरट, प्रशांत यादव पाटील, जयदीप सानप, प्रविण प्रजापती, रोहीत राठोड, शुभम सरकाळे, योगेश पाटील, डॉ. पुजा मुन, शैला मिर्झापुरे, अजय बिहाडे, सुनील समदुरकर, दिलीप मडावी, अजिक्य शिंदे, यांचेसह भाजपचे पदाधिकारी, कार्येकर्ते उपस्थित होते.
पंतप्रधानांमुळे देशाचा गौरव
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे भारताचा परदेशात गौरव वाढला आहे. ते जेव्हा कोणत्याही देशात जातात, तेव्हा रस्त्याच्या दुतर्फा त्यांच्या स्वागतासाठी रांगा लागतात. पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी पंतप्रधानांबद्दल बेताल वक्तव्य केले आहे. त्यांना या देशातील सैनिक जागा दाखवेल असा इशारा वनमंत्री सुधीर मुनगंटीवारांनी दिला. आमच्या शक्तीचा अंत पाहू नये असेही ते म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.