आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिबिराचे आयोजन:सिद्धिविनायक गणेश मंडळातर्फे रक्तदान शिबिर

दिग्रस24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील लाख रायाजी येथे सिद्धिविनायक गणेश उत्सव मंडळाच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात ५० नागरिकांनी रक्तदान केले. या सामाजिक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.दिग्रस तालुक्यातील लाख रायाजी येथील दिल्ली चौक राममंदिर सभागृहात सिद्धिविनायक गणेश उत्सव मंडळ, एक नील ब्लड बँक यवतमाळ व आरोग्यधाम हॉस्पिटल दिग्रस यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. सर्वप्रथम रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांचे सह रक्तसंकलन चमूचे गावकऱ्यांच्या वतीने स्वागत करण्यात आले.

त्यानंतर गावचे पोलीस पाटील रविशंकर ढोले पाटील यांनी या कार्यक्रमाची रूपरेषा सर्वांसमोर मांडली. या रक्तदान शिबिरात ५० नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत रक्तदान केले. या रक्तदान शिबिरामध्ये मोहसीन खान पठाण या मुस्लिम युवकाने सर्वप्रथम रक्तदान शिबिरात सहभाग घेऊन शुभारंभ केला. गावातील महिलांनी सुद्धा आपला सहभाग नोंदवून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या कार्यक्रमाचे सर्व गावकऱ्यांनी कौतुक केले. याप्रसंगी गावातील सर्व गणेश मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रतिष्ठित मंडळी, युवक बहुसंख्येने उपस्थित होते. सर्व रक्तदात्यांना मंडळाकडून चहा व अल्प उपहाराची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. सर्व गणेश उत्सव मंडळांनी असेच सामाजिक अभिनव उपक्रम कार्यक्रम राबवावे अशी अपेक्षा मंडळातर्फे व्यक्त करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...