आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजगदंबा अभियांत्रिकी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना पथका अंतर्गत सोमवार, दि. १० एप्रिल रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जगदंबा अभियांत्रिकीच्या राष्ट्रीय सेवा योजना पथक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला.या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हेमंत बारडकर, रक्त संकलन अधिकारी डॉ. रसिका पेंदोर, समाजसेवा अधीक्षक अनिल पिसे, विभाग प्रमुख डॉ. विजय नेवे, डॉ विजय भांबेरे, प्रा. धनश्री पोहरे, प्रा. मोहिउद्दीन खान, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रवीण वानखडे आदी उपस्थित होते. समाजसेवा अधीक्षक अनिल पिसे यांनी रक्तदानाचे महत्व या विषयावर सविस्तर मार्गदर्शन करुन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना रक्तदान करण्याकरता प्रेरीत केले.
तसेच यवतमाळ हा अतिउष्ण जिल्हा म्हणून प्रसिद्ध असल्यामुळे दरवर्षी उन्हाळ्यात सरकारी रक्तपेढी मध्ये रक्त पिशव्यांची कमतरता जाणवते म्हणुन जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी रक्तदान करावे असे आवाहन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हेमंत बारडकर यांनी रक्तदान करणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक करतांना सांगितले की, आज विज्ञानाच्या मदतीने विविध प्रकारच्या औषधी, वैक्सीन प्रयोगशाळेत बनवल्या जातात परंतु जिवंत राहण्यासाठी सर्वात जास्त आवश्यक असलेल्या रक्ताची आतापर्यंत निर्मिती होवु शकली नाही. रक्ताला दुसरा पर्याय नाही. रक्ताच्या कमीला फक्त रक्तदानाद्वारेच पुर्ण केल्या जाऊ शकते म्हणुन जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी रक्तदान केले पाहीजे असे प्रतिपादन केले.
या रक्तदान शिबिरात सुमारे ५७ विद्यार्थी व प्राध्यापक वृंदांनी रक्तदान करुन समाजसेवेप्रती आपली बांधिलकी दाखविली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन रासेयो स्वयंसेविका चिन्मयी तांबुले हिने केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी रासेयो विद्यार्थी प्रतिनिधी साहिल झाडे व राष्ट्रीय सेवा योजनेच्या सर्व विद्यार्थ्यांनी परीश्रम घेतले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.