आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामाहेश्वरी समाजाचा उत्पत्ती दिवस महेश नवमी च्या पावन पर्वावर माहेश्वरी मंडळद्वारे महेश नवमी उत्सव सप्ताहाचे आयोजन केले होते. त्या अंतर्गत रविवार, दि. ५ जून रोजी कोमल पनपालिया स्मृती प्रीत्यर्थ रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरात ६९ दात्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले. माहेश्वरी मंडळ, महिला मंडळ व युवा संघटन द्वारा आयोजित पवन मेडिकल येथे सकाळी ९ वाजता पासून रक्तदान शिबिराला सुरवात भगवान महेश व कोमल पनपालिया यांच्या प्रतिमेचे पुजन माहेश्वरी मंडळाचे जिल्हाध्यक्ष पवन पनपालिया यांचे हस्ते करुन सुरवात झाली. यात ६९ महिला पुरुषांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले. या कार्याला वसंतराव नाईक शासकीय महाविद्यालय येथिल रक्तपेढीचे डॉ. मेटकर, अमर इंगळे व सहकार्यांनी मदत व मार्गदर्शन करून सहकार्य केले. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त प्रस्तावित रामदेव बाबा मंदिर डोंगा कॉलनी व हिंदू मोक्षधाम येथे वृक्षारोपण करण्यात आले याचे प्रकल्प प्रमुख नंदकिशोर राठी मोहन चांडक विनोद माहेश्वरी होते. या शिबिराच्या सफलते साठी पवन पनपालिया, माहेश्वरी मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत राठी, सचिव प्रदीप राठी, रक्तदान शिबिर प्रकल्प प्रमुख राजेश माहेश्वरी, कविता पनपालिया, शांता राठी, ज्योती राठी, संगिता शितल, शितल राठी, सुनिता चांडक,ज्योती राठी, युवा संघटनेचे अंकित चांडक, अक्षय राठी, नंदकिशोर राठी, मोहन चांडक, विनोद माहेश्वरी, नरेश चांडक, महेश पनपालिया, शाम गंगन, नितेश राठी, विशाल माहेश्वरी यांच्या अथक परिश्रमाने शिबीर यशस्वी पार पडले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.