आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रक्तदान:स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवअंतर्गत रक्तदान

दारव्हा19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत सोमवार, दि. १३ जून रोजी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या संकल्पनेतून दारव्हा तालुका प्रशासनाच्या वतीने उपजिल्हा रुग्णालय येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रक्तदान शिबिराचे उद्घाटन उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रभारी तहसीलदार संजय जाधव, पुरवठा विभागाचे निरीक्षण अधिकारी गिरीश कापडे, रास्त भाव धान्य दुकान जिल्हाध्यक्ष भगवंत राऊत, डॉ. अभय मंगे यांची उपस्थिती होती.

रक्तदान शिबिरामध्ये ४५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यवतमाळ येथील एक नील रक्त पेढीने रक्त संग्रहित केले. यावेळी तलाठी नरेश कोत्तावार, महसूल कर्मचारी तुषार राठोड, महेश साखरकर, देशमुख, गावंडे, किशोर गोरडे, संजय थरकडे, रास्त भाव धान्य दुकानदार अरविंद चिरडे, शकील दुंगे, आगाशे व ऑपरेटर अमोल चव्हाण, निलेश शिंगाडे, प्रवीण जाधव, सुनील चिरडे इत्यादी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...