आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रुग्णांच्या जिवाशी खेळ:जंगल भागात बोगस डॉक्टरांचा‎ जनतेवर अघोरी उपचार‎

निगंनूर‎ ‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

उमरखेड तालुक्यातील कोर्टा प्राथमिक‎ आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या निंगनूर‎ परिसरात गेल्या कित्येक वर्षांपासून‎ बंगाली डॉक्टरांचा बाजार तेजीत‎ असल्याचे दिसून येत आहे. कोणत्याही‎ प्रकारचे वैद्यकीय शिक्षण घेतले नाही,‎ वैद्यकीय परवाना नसताना आदिवासी‎ बहुल भागातील भोळ्याभाबड्या‎ जनतेवर अघोरी उपचार करीत‎ असल्याचे चित्र पाहायला मिळत‎ आहे.

अशा बोगस डॉक्टरांवर कारवाई‎ करावी, अशी मागणी चालू आहे.‎ गेल्या काही वर्षांपासून निंगनूर‎ परिसरात बोगस डॉक्टरांची संख्या‎ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. भगंदर‎ आणि मूळव्याध सारख्या दुर्धर‎ आजारावर थेट शस्त्रक्रिया करून‎ रुग्णांच्या जिवाशी खेळ करीत आहे.‎ होमिओपॅथी, अॅलोपॅथींची सुद्धा‎ रुग्णांना यांच्याकडून ट्रीटमेंट मिळते हे‎ विशेष.

शासकीय यंत्रणा पोहोचायला‎ उशीर लागेल, अशा ठिकाणी बोगस‎ डॉक्टरांनी ठाण मांडले आहे.‎ बऱ्याचवेळा शासकीय यंत्रणेने कारवाई‎ करण्याचा प्रयत्न केला, परंतू त्यापूर्वीच‎ दुसऱ्या गावात जाऊन ठाण मांडणे‎ सुरू आहे. स्वयंघोषित नेत्यांसह काही‎ नागरिकांना हाताखाली घेऊन बोगस‎ डॉक्टर आपला धंदा राजरोसपणे‎ चालवत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.‎

बातम्या आणखी आहेत...