आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:यंदा मेमध्येच चालू होणार पुस्तकांची वाहतूक; अमरावती बालभारतीतून मिळणार तीन लाख 71 हजार 752 पाठ्यपुस्तके

यतवमाळ20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दरवर्षी जिल्हा परिषद, नगर पालिका, शासकीय, खासगी अनुदानित पहिली ते आठवी पर्यंतच्या दोन लाख ७९ हजार ६२५ विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके देण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने अमरावती बालभारती मंडळाकडून १३ लाख ७१ हजार ६५२ पाठ्यपुस्तके मिळणार आहे. साधारणत: जून महिन्यात शाळांमध्ये दाखल होणाऱ्या पाठ्यपुस्तकांची वाहतूक यंदा मे महिन्यात करण्यात येणार आहे.

जिल्हा परिषद, नगर पालिका, खासगी अनुदानित शाळेतील पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना सर्वशिक्षा कडून मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप दरवर्षी केल्या जाते. त्या अनुषंगाने गतवर्षी सर्व शिक्षाने बालभारती मंडळाकडे रितसर १५ लाख ६६ हजार २९४ पाठ्यपुस्तकांची नोंदणी केली होती. नोंदणीनंतर प्राप्त झालेले पाठ्यपुस्तकांचे वाटप विद्यार्थ्यांना विलंबाने होते. यंदा हा प्रकार होवू नये म्हणून महाराष्ट्र शिक्षण परिषदेने पाठ्यपुस्तकांची नोंदणी मार्च महिन्यात करावी, असे सुचविले होते. त्यानुसार जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभाग, सर्वशिक्षाच्या वतीने मार्च महिन्यात ई-बालभारती पोर्टलवर १३ लाख ७१ हजार ७५२ पुस्तकांची नोंदणी केली होती. नोंदणीनुसार अमरावती बालभारती डेपोत पाठ्यपुस्तके दाखल झाली आहे.

विशेष म्हणजे दरवर्षी शैक्षणिक वर्षांच्या सुरूवातीला पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्याचा दावा केला जातो, परंतू विद्यार्थ्यांच्या हातात विलंबाने पुस्तके पडतात. यंदा असा प्रकार घडू नये म्हणून मे महिन्यातच पाठ्यपुस्तकांची वाहतूक करण्याचे निर्देश देण्यात आले असून, पुढील आठवड्यापासून पुस्तके टप्प्या-टप्प्याने जिल्ह्यात दाखल होणार आहे. जिल्हा परिषद १८०, नगर पालिकेचे ८, असे मिळून जिल्हाभरात एकूण १८८ केंद्र आहेत. या केंद्रावर पाठ्यपुस्तकांचे वितरण शाळा चालू होण्यापूर्वी करण्यात येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...