आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवासी उपजल्हाधिकाऱ्यांना निवेदन:माळवाकद येथील समस्या न सोडवल्यास निवडणुकीवर बहिष्कार; गावकऱ्यांनी घेतला आक्रमक पवित्रा

महागावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील माळ वाकद गावाला अनेक समस्याने ग्रासले आहे. गावात मुलभुत सुविधांचा अभाव निर्माण होवुन नागरिकांना दुर्धर आजारासह विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. प्रशासनाने या समस्या न सोडवल्यास येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेत तशा आशयाचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.

महागाव तालुक्यातील माळ वाकद गावामध्ये मुलभूत सोयी सुविधांसह, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, बंद असलेले आरोग्य केंद्र, माळ वाकद ते सातघरी रस्त्याचे रखडलेले काम, दूषित पाण्यामुळे किडनीच्या आजाराचे वाढते रुग्ण यासह विविध समस्याच समस्या निर्माण झाल्या असुन याकडे लोकप्रतिनिधीसह प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. गावकऱ्यांनी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी पुर्वी माळ वाकद येथे आर ओ प्लांट उभारून गावकऱ्यांना पिण्याच्या स्वच्छ, आरोग्यदायी पाण्याची व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अनेक वर्षांपासून बंद असलेले आरोग्य केंद्र सुरू करावे, माळ वाकद ते सातघरी रस्त्याचे रखडलेले काम सुरू करावे, अन्यथा होवु घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचे निवेदन तहसीलदार, गटविकास अधिकारी, पोलिस स्टेशन यांना दिले.

बातम्या आणखी आहेत...