आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीएफएमएस:बीआरसीचे खाते उघडले, मात्र शालेय अनुदान वितरण ठप्प ;  शाळेचे संपूर्ण व्यवहार रखडलेले

यवतमाळ4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे विद्यमान बँकेतील खाते ऑक्टोबर महिन्यातच बंद करण्यात आले. खात्यातील संपूर्ण निधीसुद्धा शासनाकडे वळता झाला होता. दरम्यान, जिल्ह्यासह सोळाही गट संसाधन केंद्राचे (बीआरसी) खाते एचडीएफसी बँकेत उघडण्यात आले. मात्र, अद्यापही शाळेच्या खात्याबाबत कुठलाही आदेश प्राप्त झाला नाही. परिणामी, शाळा अनुदान वितरणाचा निधी अद्यापही रखडलेलाच आहे.

केंद्र शासनाने संपूर्ण व्यवहार सार्वजनिक आर्थिक व्यवस्थापन प्रणाली (पीएफएमएस) च्या माध्यमातून करण्यास सुरू केला आहे. प्रामुख्याने सर्व शिक्षाचे अनुदान वितरण सुद्धा पीएफएमएस प्रणालीतूनच केली जात आहे. यात आता जिल्हा परिषद प्राथमिक, माध्यमिक शाळांनासुद्धा अंतर्भूत करण्यात आले आहे. त्यानुसार शाळांच्या बँक खात्यातून ही प्रणाली राबवण्यात येणार होती. मात्र, संबंधित बँकेने ह्यासाठी असमर्थता दर्शवली होती. मध्यंतरी केंद्र शासनाकडे मार्गदर्शन मागवण्यात आले होते.

त्यानुसार एचडीएफसी बँकेत खाते उघडण्याच्या दृष्टीने चार महिन्यापूर्वीच केंद्र शासनाने सुचना दिल्या होत्या. प्राप्त सूचनेनुसार जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाला अवगत करण्यात आले होते. त्या कालावधीत जिल्ह्यातील शाळेच्या बँक खात्यात गणवेशासह शाळा अनुदान आणि इतरही निधी होता. हा निधी सप्टेंबर महिन्यापर्यंत खर्च करावा, असे आदेश जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने दिले होते. शेवटी २६ सप्टेंबर २०२२ रोजी जिल्हा परिषदेच्या दोन हजार दोनशेहून अधिक शाळांचे खाते बंद केले.

या बँक खात्यात जमा असलेला गणवेश, शाळा अनुदान यासह इतरही अनुदानाचे कोट्यवधी रूपये सर्व शिक्षाकडे वळते झाले. सर्वप्रथम जिल्ह्याचे आणि गट संसाधन केंद्राचे खाते उघडण्याची प्रक्रीया सुरू झाली. आतापर्यंत सोळाही गट संसाधन केंद्राचे खाते उघडण्यात आले आहे. मात्र, शाळेच्या खात्याबाबत शासनाने कुठलाही निर्णय घेतला नाही. परिणामी, शाळेचे संपूर्ण व्यवहार ठप्प पडले आहे. शाळा अनुदानाचा निधी सध्यातरी सर्व शिक्षाकडेच पडून आहे. येत्या काही दिवसांत ह्याबाबत निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांच्या गणवेशाची आणखी वांदेवाडी शाळेच्या बँक खात्यात सर्व शिक्षाच्या वतीने गणवेश खरेदीचा निधी पाठविण्यात आला होता. त्यानुसार गणवेश खरेदी करणे गरजेचे होते, परंतू बहुतांश शाळांनी विद्यार्थ्यांच्या खात्यात गणवेशाचा निधी वळता केलाच नाही. परिणामी, आजही विद्यार्थी रंगीबेरंगी गणवेशात शाळेमध्ये येत आहे. आता नविन खाते उघडण्यात आल्यानंतरच गणवेशाचा मार्ग मोकळा होणार आहे.

उधारीवरच चालतोय शाळेचा व्यवहार जिल्ह्यातील प्राथमिक शाळांचे बँक खात्यातील निधी सप्टेंबर महिन्यातच परत गेला होता. त्यामुळे मागिल दोन महिन्यापासून शाळांचे व्यवहार करण्याकरता मुख्याध्यापकांकडे निधी नव्हता. शेवटी मुख्याध्यापकांना संपूर्ण व्यवहार उधारीवरच करावा लागला. आता ही उधारी फेडण्यासाठी बँक खाते लवकर उघडणे गरजेचे आहे.

जमा निधी परत आला शाळांच्या खात्यातील निधी सप्टेंबर महिन्यात शासन जमा झाला होता. दरम्यान, नव्याने बँक खाते उघडण्यात येईल, अशी शक्यता होती. मात्र, शासनाने कुठलेही आदेश दिले नाही. आता काही दिवसांपूर्वीच शासनाने जमा केलेला निधी परत दिला आहे. आता लवकरच पंचायत समितीला लिमिट चेक देणार आहे. तद्नंतर आदेशानुसार कार्यवाही केल्या जाईल. प्रमोद सुर्यवंशी, शिक्षणाधिकारी

बातम्या आणखी आहेत...