आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:जिल्हा रुग्णालयात स्तन कर्करोगाचे निदान‎ ; बाह्यरुग्ण विभागात महिला दिनी सुरूवात

यवतमाळ‎12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महिलांमध्ये आढळणाऱ्या‎ कर्करोगामध्ये २/३ प्रमाण हे‎ स्तनाच्या कर्करोगाचे आहे. ही बाब‎ लक्षात घेता स्तनाच्या कर्करोगाचे‎ निदान व समुपदेशन तातडीने व्हावे‎ या उद्देशाने वसंतराव नाईक जिल्हा‎ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व‎ रुग्णालय येथे वैद्यकीय शिक्षण व‎ संशोधन विभागाचे अंतर्गत‎ बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्यात‎ आला आहे. ८ मार्च रोजी जागतिक‎ महिला दिनाचे औचित्य साधुन या‎ बाह्यरुग्ण विभागाचे लोकार्पण‎ करण्यात आले.‎ या बाह्यरुग्ण विभागाचे उद्घाटन‎ वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. गिरीश‎ जतकर यांच्या हस्ते करण्यात आले.‎

जिल्हा रुग्णालयामध्ये सुरू‎ करण्यात आलेल्या या उपक्रमाचे‎ नोडल ऑफिसर म्हणुन डॉ. अमोल‎ देशपांडे यांची नियुक्ती करण्यात‎ आली आहे. उद्घाटन‎ कार्यक्रमासाठी अधीक्षक डॉ. सुरेंद्र‎ भुयार, स्त्री रोग विभाग प्रमुख डॉ.‎ क्षमा केदार, डॉ. विजय पोटे, डॉ.‎ कणाके, डॉ. राजु गोरे, डॉ रजनी‎ कांबळे, डॉ. प्रांजल मदनकर, डॉ.‎ शैलेश पाटील हजर होते. स्तनाच्या‎ कॅन्सरचे दिवसेंदिवस वाढते प्रमाण‎ लक्षात घेता महिलांची योग्य‎ तपासणी व्हावी आणि वेळेत या‎ रोगाचे नीदान होवुन त्यासंदर्भात‎ योग्य समुपदेशन करता यावे या‎ उद्देशाने मंत्री गिरीश महाजन यांच्या‎ पुढाकारातून संपुर्ण महाराष्ट्रातील‎ वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये हा‎ उपक्रम राबवण्यात येत आहे.

त्यात‎ वैद्यकीय शिक्षण व संशोधन‎ विभागाचे अंतर्गत स्तनाचे कर्करोग‎ निदान व समुपदेशन बाबत बाह्यरुग्ण‎ विभाग सुरू करण्याचे निर्देश देण्यात‎ आले होते. त्यावरुन यवतमाळ‎ येथील जिल्हा रुग्णालयात महिला‎ दिनाचे औचित्य साधुन महिलांसाठी‎ असलेल्या या ओपीडीचे उद्घाटन‎ करण्यात आले.‎ या उपक्रमा अंतर्गत दर बुधवारी‎ दुपारी १२ ते २ या कालावधीत‎ महिलांसाठी तयार करण्यात‎ आलेली ही विशेष ओपीडी‎ रुग्णालयातील कक्ष क्रमांक ६५ मध्ये‎ सुरू राहणार आहे.‎

वेळीच निदान होणे आवश्यक‎ स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. मात्र त्याचे वेळात निदान‎ झाल्यास योग्य उपचार शक्य आहे. ही बाब लक्षात घेता या बाह्यरुग्ण‎ विभागाची सुरूवात करण्यात आली आहे. या ठिकाणी तपासणी,‎ सोनोग्राफी ही सुविधा पुर्णपणे मोफत उपलब्ध राहणार आहे. त्यामुळे ३०‎ वर्षांवरील महिलांनी या ठिकाणी येवुन तपासणी करुन घ्यावी.‎ डॉ. अमोल देशपांडे, कर्करोग तज्ज्ञ तथा नोडल ऑफीसर‎

बातम्या आणखी आहेत...