आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्गदर्शन:देशमुख महाविद्यालयात स्तनपान सप्ताह

दिग्रसएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सविताबाई उत्तमराव देशमुख महाविद्यालय येथील गृह अर्थशास्त्र विभाग व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १ ते ७ ऑगस्ट दरम्यान स्तनपान सप्ताह राबवण्यात आला.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. गोल्डी जांभूळकर या होत्या. तसेच गृह अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. प्रीती गावडे यांनी विद्यार्थिनींना स्तनपानाविषयी मार्गदर्शन केले.

मुलींना स्तनपानाची आवश्यकता स्तनपानाचे महत्त्व व बालकाचा विकास, मातेच्या व बालकाच्या आरोग्यासाठी स्तनपान कसे महत्त्वाचे आहे. तसेच स्तनपानाचे फायदे काय आहे. याविषयी मुलींना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे संचालन सलोनी चव्हाण तर आभार गीता काकनवार हिने केले. कार्यक्रमाला बहुतांश मुली उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

बातम्या आणखी आहेत...