आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात जिल्ह्यातील तब्बल चार महत्त्वाच्या आणि प्रलंबित प्रकल्पांचा समावेश केला. कदाचित राज्याच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच एवढा बहुमान जिल्ह्याला मिळाला असेल. हा अर्थसंकल्प जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाचा आहे, अशी प्रतिक्रिया आमदार श्वेता महाले यांनी व्यक्त केली आहे. ७० वर्षे सत्तेत असणारे काँग्रेस-राष्ट्रवादी चे सरकार छत्रपतींच्या जन्मदात्या राजमाता जिजाऊंच्या बुलडाणा जिल्ह्याला कायम विसरत आले, असे श्वेता महाले म्हणाल्या. जिल्ह्यातील स्वातंत्र्यपूर्व काळापासून प्रलंबित प्रश्न उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मार्गी लावले आहेत.
खामगाव-जालना रेल्वेमार्ग, सिंदखेडराजा-शेगाव चारपदरी महामार्ग, बुलडाण्यात वैद्यकीय महाविद्यालयास मान्यता आणि शेतकऱ्यांसाठी संत्रा प्रक्रिया उद्योग या महत्त्वाच्या प्रकल्पांचा त्यांनी अर्थसंकल्पात समावेश केला. जिल्ह्याच्या परिपूर्ण विकासाला भरारी देणारा आणि ७० वर्षांचा अनुशेष भरून काढणारा हा अर्थसंकल्प आहे, असे असे आमदार श्वेता महाले म्हणाल्या. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यांनी धनगर समाजासाठी भरीव तरतूद आणि वडार समाजाच्या आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची मागणी स्वीकारून दोन्ही समाजांच्या मागण्या पूर्ण केल्या, असे त्या म्हणाल्या.फडणवीस यांचे तोंड केले गोड उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात बुलडाणा जिल्ह्यासाठी महत्त्वाचे प्रकल्प मार्गी लावले. याबद्दल आमदार श्वेता महाले यांनी पेढा भरवून त्यांचे आभार व्यक्त केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.