आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लंपास:दिवसाढवळ्या महागाव येथे घरफोडी; 75  हजारांची रोकड लंपास

महागाव18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील प्रभाग क्र.१७ मधील दिवसाढवळ्या घराची कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी ७५ हजार रोख लंपास केले आहेत. मंगळवारी दुपारी ४.३० वाजल्याच्या दरम्यान हा प्रकार घडला आहे. पोलिसांनी या प्रकरणात तपासाला सुरुवात केला आहे.महागाव शहरातील महामार्गालगत असलेल्या सोहम पाटील शिंदे यांच्या घरी साडे चार वाजता च्या सुमारास घरी कोणी नसल्याचे पाहुन अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून कपाटातील रोख ७५ हजार चोरून नेले.काल ६ जुन रोजी सवना येथे नातेवाईकांकडे गेले असता या संधीचा फायदा घेत चोरट्यांनी संधी साधली भर रस्त्यावरील घर फोडी झाल्याने पोलीस ही चक्रावले आहे.

महागाव शहरात काही दिवसापासुन चोरी चे प्रमाण वाढले असल्याने नागरिका मध्ये दहशत निर्माण झाली आहे. दिवसेंदिवस चोऱ्यांचे प्रमाण वाढत असल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. या घटनेची माहिती सोहम शिंदे यांनी पोलिसांना देताच घटना ठीकाणी पोलीस दाखल झाले असुन पुढील तपास पोलीस उप निरिक्षक खंदारे करीत आहे

बातम्या आणखी आहेत...