आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घर जळून खाक:सोनखास येथे घर जळून खाक; ही घटना सोमवारी सकाळी घडली

कळंब16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मावळणी गट ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या सोनखास येथील सचिन मून यांच्या घराला आग लागली. यात संपूर्ण साहित्य जळुन खाक झाले. तसेच लक्ष्मण महादेव भोयर यांचे शेतीच पाईप, बैलाचे कुटार, लगतच्या शांताबाई राऊत यांच्या घराचे ताटवे आगीत भस्मसात झाले. ही घटना सोमवारी सकाळी घडली.

आगीत झालेल्या नुकसानीचे पाहणी करण्याकरिता सरपंच दीपाली जामुनकर, उपसरपंच मनीषा काटे, पटवारी तिराळे, बिटजमादार झोटिंग, कृषी सहाय्यक चंदनशिवे, ग्रामपंचायत सदस्य शीला भोयर यांनी पाहणी केली. झालेल्या नुकसानीची दखल घेतली. गावकऱ्यांच्या सहकाऱ्याने मोठ्या प्रमाणात होणारे नुकसान टळले. पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली. प्राथमिक स्वरूपाची मदत करण्यासाठी तहसीलदार चव्हाण, तिराळे यांनी सहकार्य केले आहे.

दरम्यान, तहसीलदार डॉ. सुनील चव्हाण यांनी अवघ्या दोन तासांत पाच हजार रूपये सानुग्रह अनुदान तसेच गहू, तांदूळ, साखर आदी प्रकारची शासनाकडून तातडीची मदत मिळवून दिली.

बातम्या आणखी आहेत...