आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोठ्याला आग:सिंचनाच्या पाइपसह अवजारे भस्मसात; आशिष बबनराव गोखरे असे नुकसानग्रस्त शेतकऱ्याचे नाव आहे

मारेगाव18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील कुंभा येथील शेत शिवारात असलेल्या गोठ्याला आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. ही आग सोमवारी दुपारच्या सुमारास घडली. आशिष बबनराव गोखरे असे नुकसानग्रस्त शेतकऱ्याचे नाव आहे.

पीडित शेतकऱ्याचे शेत कुंभा शिवारात आहे.येथे असलेल्या गोठ्यात गुरांचे वैरणसह शेतीउपयोगी अवजारे आणि सिंचनाचे साहित्य ठेवले होते. सोमवारी दुपारी अचानक गोठ्याला आग लागली व आगीने रौद्ररूप धारण करीत संपूर्ण गोठा कवेत घेतला. यात असलेले जवळपास तीन चार लाखांचे साहित्य जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

दरम्यान आग नेमकी कशी लागली याबाबतची माहिती अजून स्पष्ट नाही, मात्र शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने प्रशासनाने तात्काळ पंचनामा करून मदत करावी अशी मागणी आहे.

बातम्या आणखी आहेत...