आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नुकसान भरपाईची केली मागणी‎:बेंबळाचे कालवे फुटून‎ नुकसान, शेतकऱ्यांचे धरणे‎

मारेगाव‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

निकृष्ट बांधकाम असलेल्या बेंबळा‎ कालवा व पाटसऱ्या अतिवृष्टीत‎ पावसाने फुटून मार्डी परिसरातील‎ शेतकऱ्यांच्या शेत पिकाचे व शेतीचे‎ अतोनात नुकसान झाले. नुकसान‎ ग्रस्त शेतकऱ्यांनी बेंबळा‎ विभागाकडे नुकसानग्रस्त‎ शेतकऱ्यांनी मागणी करून सुद्धा‎ मुजोर बेंबळा अधिकार्‍यानी दुर्लक्ष‎ करित नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना‎ वाऱ्यावर सोडले, मात्र नुकसानग्रस्त‎ शेतकरी एकत्र येत दि. ४‎ ऑक्टोबरला मारेगाव तहसिल‎ समोर एकदिवसीय धरणे आंदोलन‎ करित शासनाचे लक्ष वेधले.‎

या धरणे आंदोलनाला संभाजी‎ ब्रिगेड, मनसे, राष्ट्रवादी पक्षाने‎ पाठिंबा देत नुकसानग्रस्त‎ शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी‎ तिव्र लढा उभारू असा विश्वास‎ दिला. धरणे आंदोलनामध्ये बेंबळा‎ प्रकल्प हक्क संघर्ष समितीचे प्रमुख‎ सुमित जुनगरी, शेतकरी सुधाकर‎ इंगोले, सिंदी महागावचे उपसरपंच‎ अविनाश लांबट, सावंगीचे सरपंच‎ अभिजीत मांडेकर, देवाळा येथील‎ शेतकरी सुरेश लांडे, दापोरा येथील‎ चंद्रशेखर जवादे, बोरी गदाजी‎ येथील प्रविण नान्ने, माणिक कांबळे‎ व बहुसंख्ये शेतकरी उपस्थित होते,‎ शेवटी शेतकऱ्यांनी तहसीलदार‎ दीपक पुंडे यांना निवेदन सादर केले.‎

बातम्या आणखी आहेत...