आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा२०२२-२३ या आर्थिक वर्षात गोदावरी अर्बनद्वारे ३ हजार ३३२ कोटींचा व्यवसाय व विक्रमी १ हजार ९३१ कोटींच्या ठेवी ही ग्राहकांच्या विश्वासाची पावती आहे. यासोबतच कर्मचाऱ्यांची सचोटी व कार्य तत्परतेमुळे प्रगतीचा आलेख असाच उंचावत राहील, असा विश्वास गोदावरी अर्बनचे अध्यक्ष राजश्री पाटील यांनी व्यक्त केला. वार्षीक अर्थीक पत्रक अहवाल सादरीकरण कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर, संस्थेचे सचिव अॅड. रवींद्र रगटे, संचालक प्रा. सुरेश कटकमवार, वर्षा देशमुख, प्रसाद पाटील लेखा परिक्षक जीवन लाभशेटवार, मुख्य व्यवस्थापक सुरेखा दवे-सावंत, अधीक्षक विजय शिरमेवार यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. १ एप्रिल २०२२ ते ३१ मार्च २०२३ या आर्थीक वर्षात संस्थेने १ हजार ९३१ कोटीं ठेवींचा पल्ला गाठला असून, यातून १ हजार ४०२ कोटींचे कर्ज वितरण केले आहे.
या वर्षभरात संस्थेने एकूण ३ हजार ३३२ कोटींचा व्यवसाय केला आहे.पुढील आर्थिक वर्षाच्या सर्व वैधानिक तरतुदी करून संस्थेला २४ कोटींचा शुद्ध नफा झाला आहे. संस्थापक खासदार हेमंत पाटील यांनी भ्रमणध्वनी द्वारे संस्थेच्या अध्यक्ष राजश्री पाटील, समस्त संचालक मंडळ, व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर यांच्यासह कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.