आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोटनिवडणूक:73 ग्रा.पं.ची पोटनिवडणूक 18 सप्टेंबर रोजी

यवतमाळ3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जानेवारी २०२१ ते सप्टेंबर २०२२ ह्या कालावधीत मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील ७३ ग्रामपंचायतीची पोटनिवडणूक १८ सप्टेंबर रोजी होणार आहे. त्या अनुषंगाने गुरूवार, दि. १८ ऑगस्ट रोजी तहसीलदारांनी नोटीस प्रसिद्ध केली. बुधवार, दि. २४ ऑगस्ट ते दि. एक सप्टेंबर रोजी पर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार आहे.

छोट्या खेडेगावाचा कारभार ग्रामपंचायत नावाची स्थानिक स्वराज्य संस्था पाहते. निवडणूक आयोगाने २९ नोव्हेंबर २०१९ रोजी प्रभाग रचना, आरक्षणाबाबत कार्यक्रम दिला होता. हा कार्यक्रम चुकीच्या पद्धतीने राबवण्यात आला होता. परिणामी, जानेवारी २०२१ ते मे २०२२ आणि जून ते सप्टेंबर २०२२ ह्या कालावधीत जिल्ह्यातील ७३ ग्रामपंचायतीची मुदत संपुष्टात येणार आहे. सर्वांत महत्वाचे म्हणजे न्यायालयाने ओबीसी आरक्षणास मान्यता दिली आहे.

दरम्यान, जानेवारी ते डिसेंबर २०२२ पर्यंत मुदत संपलेल्या १७२ ग्रामपंचायतीच्या प्रभाग सीमा निश्चितीचा कार्यक्रम पार पडला. तर नागरिकांचा मागास प्रवर्ग, ओबीसी महिला आणि सर्वसाधारण महिला संवर्गानुसार आरक्षणाची सोडत शुक्रवार, दि. २९ जुलै रोजी काढण्यात आली. हरकती व सूचनांच्या दुरूस्तीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी मान्यता दिली. आता निवडणूक आयोगाने राज्यातील ६०८ ग्रामपंचायतीची निवडणूक दि. १८ सप्टेंबर रोजी होणार आहे.

यात बाभूळगाव २, कळंब २, यवतमाळ ३, महागाव एक, आर्णी ४, घाटंजी ६, केळापूर २५, राळेगाव ११, मारेगाव ११, झरीजामणी ८, असे दहा तालुक्यात मिळून ७३ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. निवडणुकीची नोटीस गुरूवार, दि. १८ ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील दहा तहसीलदारांनी प्रसिद्ध केली.

दरम्यान, बुधवार, दि. २४ ऑगस्ट रोजी नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरूवात होणार आहे. तद्नंतर सुटीचे दिवस वगळून गुरूवार, दि. एक सप्टेंबर रोजी पर्यंत अर्ज दाखल करता येणार आहे. शुक्रवार, दि. २ सप्टेंबर रोजी छाननी होणार आहे. तर मंगळवार, दि. ६ सप्टेंबर रोजी पर्यंत अर्ज मागे घेता येणार आहे. त्याच दिवशी दुपारी वाजता चिन्ह वाटप होणार आहे. तेथून बारा दिवसानंतर म्हणजे रविवार, दि. १८ सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे. सोमवार, दि. १९ सप्टेंबर रोजी मतमोजणी होणार असून, गुरूवार दि. २२ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निकालाची अधिसूचना प्रसिद्ध केल्या जाणार आहे.

जात वैधता प्रमाणपत्रासाठी हमीपत्र देता येणार
निवडणूक रिंगणात उतरू इच्छिणाऱ्या उमेदवारांना संगणकीय प्रणालीद्वारे नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार आहे. तर नामनिर्देशन पत्र दाखल करताना जात वैधता प्रमाणपत्र दाखल करावे लागते, परंतू बहुतांश वेळा जातवैधता प्रमाणपत्र विहित मुदतीत मिळत नाही. अशा उमेदवारांना अर्ज दाखल करताना हमीपत्र द्यावे लागणार आहे. निवडूण आल्याच्या तारखेपासून उमेदवारांना १२ महिन्याच्या आत जात वैधता प्रमाणपत्र दाखल करावे लागणार आहे.

निवडणूक रिंगणात उतरू इच्छिणाऱ्या उमेदवारांना संगणकीय प्रणालीद्वारे नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार आहे. तर नामनिर्देशन पत्र दाखल करताना जात वैधता प्रमाणपत्र दाखल करावे लागते, परंतू बहुतांश वेळा जातवैधता प्रमाणपत्र विहित मुदतीत मिळत नाही. अशा उमेदवारांना अर्ज दाखल करताना हमीपत्र द्यावे लागणार आहे. निवडूण आल्याच्या तारखेपासून उमेदवारांना १२ महिन्याच्या आत जात वैधता प्रमाणपत्र दाखल करावे लागणार आहे.

बातम्या आणखी आहेत...