आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकरंजी येथील सार्वजनिक भीम जयंती उत्सव समितीच्या वतीने १४ एप्रिल रोजी आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त दि. १ ते १४ पर्यंत स्पर्धा परीक्षा, भाषण स्पर्धा, रांगोळी स्पर्धा व शुध्द लेखन स्पर्धेचे आयोजन केले आहे. त्या निमित्त बुधवार, दि. ६ एप्रिल रोजी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा घेण्यात आली.
या स्पर्धा परीक्षेत वर्ग चौथी ते सातवीच्या जवळपास ८० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. १४ एप्रिल रोजी जयंती दिनी मान्यवरांच्या हस्ते या स्पर्धा परीक्षेत गुणानुक्रमे क्रमांक मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा जयंती मंडळाकडून प्रशस्ती पत्र देवून गौरव करण्यात येणार आहे.
या बालवयातच स्पर्धा परीक्षेचे धडे गिरवणाऱ्या मुलांचे उज्वल भविष्य असणार असून त्यांना आतापासूनच स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण व्हावी, स्पर्धेच्या युगात बदलते शैक्षणिक धोरण अंगीकारून त्यांना भविष्यात अनेक स्पर्धा परीक्षेला सामोरे जाण्यास सहज व सुलभ होईल.
जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी नेहमीच अशा स्पर्धा परीक्षेत सहभागी होवून आपल्या ज्ञानाची चुणूक दाखविण्यात माहिर आहेत. यापूर्वी शिक्षण विभागाकडून घेण्यात आलेली महादीप परीक्षेत आपली गुणवत्ता या विद्यार्थ्यांनी सिध्द केली. जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक रविकिरण काटोले, सहशिक्षक रंधे, सातपुते, धुळे, राठोड हे शैँक्षणिक कौशल्य पणाला लावून विद्यार्थ्यांमध्ये बौद्धिक व शारीरीक चाचणी प्रगतशील ठेवण्यासाठी परिश्रम घेत आहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.