आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वीज जोडणी:सार्वजनिक उत्सवासाठी अधिकृत वीज जोडणी करण्याचे आवाहन

यवतमाळ6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सार्वजनिक उत्सवांची लगबग सुरू झाली आहे. विजेच्या झगमगाटात साजरा होणाऱ्या उत्सवासाठी महावितरणकडून तात्काळ तात्पुरता वीज जोडणी देण्याची सोय करण्यात येत आहे. सुचना सर्व क्षेत्रीय कार्यालयांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे उत्सव साजरा करणाऱ्या मंडळांनी अधिकृत वीज जोडणी करावी, असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे.

उत्सव काळात सुरळीत आणि अखंडित वीज पुरवठा मिळावा यासाठी आवश्यक त्या देखभाल दुरुस्ती करण्यात येत आहे. मोहरम, दहीहंडी तसेच गणेशोत्सवासह इतरही उत्सवात मोठ्या प्रमाणात जनतेचा सहभाग असतो. यात सर्वांची सुरक्षा अत्यंत महत्वाची असल्याने अधिकृत वीज पुरवठा घेणे अत्यावश्यक आहे. पावसाळ्याचे दिवस असल्याने मंडप, रोषणाईसाठी विद्युत व्यवस्था, संच मांडणी ही अधिकृत विद्युत कंत्राटदारांकडूनच करून घेणे आवश्यक आहे. सार्वजनिक सुरक्षेला प्राधान्य देत महावितरणने प्रत्येक विभागानुसार दामिनी पथक तयार केले जाणार आहे.

महिला प्रतिनिधी असलेल्या पथकाकडून विभागातील उत्सव मंडळाला भेटी देण्यात येणार आहे आणि वीज जोडणीची तपासणी करण्यात येणार आहे. अनाधिकृत वीज जोडणी आढळल्यास अशा मंडळांना दामिनी पथकाद्वारे अपघात टाळण्याकरता सुरक्षा, विजचोरीच्या परिणामाची जाणीव करून देण्यात येणार आहे. त्या मंडळांना अधिकृत वीज जोडणीसाठी प्रवृत्त करण्यात येणार आहे. तरीही जे मंडळ अधिकृत वीज पुरवठ्यासाठी पुढे येणार नाही, त्या मंडळाचा वीज पुरवठा ताबडतोब बंद करण्यात येणार आहे. आणि अनधिकृत वीज जोडणीसाठी विद्युत कायदा २००३ अंतर्गत नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे. मोहरम, गणेश उत्सव अश्या उत्सवात मिरवणूक निघत असल्याने उत्सव मंडळांनी मिरवणूक पथातील वीज वाहिन्यांच्या अनुषंगाने देखावे, सजावट, रोषनाई, मुर्तीची उंची आदींबाबत काळजी घेणे गरजेचे आहे. विजेपुढे चुकीला क्षमा नाही. त्यामुळे उत्सवावर विरजण पडू नये यासाठी आवश्यक त्या सर्व काळजी घेण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

बातम्या आणखी आहेत...