आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यातील शंभर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी रविवार, दि. १८ डिसेंबर रोजी होणार आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने सुरू असलेला प्रचार शुक्रवार, दि. १६ डिसेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास थंडावला आहे. आता उरलेल्या वेळेत मुक प्रचारावर भर राहणार आहे. आतापर्यंत ७ सरपंच आणि १२७ सदस्य अविरोध निवडूण आले असून, ९३ सरपंच, आणि ६४९ सदस्य मतदान प्रक्रियेतून निवडूण येणार आहे.
जिल्ह्यातील तेरा तालुक्यातील मुदत संपलेल्या शंभर ग्रामपंचायतीच्या ३०८ प्रभागातील ७७६ सदस्य आणि शंभर सरपंच पदासाठी निवडणूक जाहीर झाली होती. निवडणुकीपूर्वीच जिल्ह्यातील सात ग्रामपंचायतीतील सात सरपंच आणि १२७ सदस्य अविरोध निवडूण आले होते. तर रविवार, दि. १८ डिसेंबर रोजी उर्वरीत ९३ सरपंच आणि ६४९ सदस्यांकरीता मतदान होणार आहे.
या करीता ३१० पोलिंग बुथ आहेत. या बुथवर प्रत्येकी एक मतदान केंद्राध्यक्ष, ३ मतदान अधिकारी, प्रत्येकी एक पोलिस कर्मचारी, ४० झोनल अधिकारी, तर तहसीलचे दीडशेहून अधिक कर्मचारी कर्तव्य बजावणार आहे. गेल्या दहा दिवसांपासून निवडणूक रिंगणातील उमेदवारांनी विविध प्रकारे प्रचार केला. अशात शुक्रवार, दि. १६ डिसेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास प्रचार कार्य थंडावले आहे. उर्वरीत कालावधीत निवडणूक रिंगणातील उमेदवारांकडून मुक प्रचारावर भर दिल्या जाणार आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने प्रशासनाने संपूर्ण तयारी केली असून, ३५० कंट्रोल युनिट, सहाशे बॅलेट युनिट आदींचे वितरण करण्यात आले आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुठल्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये ह्याकरीता पोलिसांनी सुद्धा विशेष बंदोबस्त ठेवला आहे.
सरपंच पदासाठी होणार रस्सीखेच
यंदा मतदारामधूनच सरपंचाची निवड होणार आहे. सरपंच पदाच्या ९३ जागेकरिता २९३ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. या उमेदवारांचे प्रचार कार्य अत्यंत जोमात आहे. निवडूण येण्यासाठी उमेदवारांनी मतदारांना विविध प्रकारचे आमिष दिले आहे. यावरून सरपंच पदाकरीता चांगलीच रस्सीखेच होणार असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. एकंदरीत सोमवार, दि. १९ डिसेंबर रोजी होणाऱ्या मतमोजणीनंतरच सर्व चित्र स्पष्ट होइल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.