आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन:आरोग्य भरती रद्द करा, शेकडो स्पर्धा परीक्षार्थ्यांचा महाआक्रोश मोर्चा ; मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना दिले निवेदन

यवतमाळ14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्‍या विद्यार्थ्यांमध्ये कमालीचा रोष असून ज्या परीक्षा झाल्या त्यात भ्रष्टाचार समोर येत आहे. त्यामुळे पद भरती ठप्प आहे. त्यामुळे संतप्त स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्‍या विद्यार्थ्यांनी शुक्रवार, दि. १७ जूनला महा आक्रोश मोर्चा काढला. आरोग्य भरती रद्द करून तलाठी तसेच इतर विभागातील जागा भराव्या अशी मागणी विद्यार्थ्याची आहे.

आरोग्य विभागातील विविध संवर्गातील गट क आणि ड मध्ये सहा हजार पेक्षा जास्त पदांची परीक्षा घेण्यात आली. यात घोटाळा बाहेरआला. असे असतानाही परीक्षा रद्द करण्यास आरोग्य विभाग चालढकल करीत आहे. त्यामुळे ही परीक्षा रद्द कराची अशी मागणी विद्यार्थ्यांची आहे. पोलिस विभागातील जागा रिक्त आहे. जून महिन्यात पद भरती सुरू करण्यात येईल असे आश्‍वासन गृहमंत्र्यांनी दिले होते. अजूनही प्रक्रिया सुरू झालेली नाही. पोलिस भरतीची प्रक्रिया तत्काळ सुरू करावी, अशी मागणीही विद्यार्थ्यांची आहे. या शिवाय तलाठी तसेच इतर विभागातील रिक्त जागांची जाहिरात शासनाने प्रसिद्ध करावी अशी मागणी एमपीएससी समन्वय समितीची आहे. १५ दिवसात जिल्हा परिषद परीक्षांच्या तारखा जाहीर कराव्या, सर्व पदांची परीक्षा एकदाच ऑफलाईन घेण्यात याची, एकापेक्षा जास्त जिल्हा परिषदेत अर्ज केलेल्या उमेदवारांना सगळीकडे ग्राह्य धरावे, जिल्हा निवड समितीला अधिकार द्यावे, परीक्षा घेताना सामान्य प्रशासन विभागाने दिलेल्या ‘एसओपी’चे काटेकोर पणे पालक व्हावी अशी मागणी विद्यार्थ्यांची आहे. या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी शिवाजी मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढला होता. आपल्या मागण्याचे निवेदन जिल्हाधिकारी तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना दिले. यावेळी ज्ञानेश्‍वर राठोड, प्रदीप नारसे, समशेर पठाण, नीलेश जाधव यांच्यासह शेकडो विद्यार्थी महा आक्रोश मोर्चात सहभागी झाले होते.

बातम्या आणखी आहेत...