आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानगरपंचायत राळेगावकडून प्रशासक काळात तत्कालीन मुख्याधिकारी अरुण मोकळ यांनी दिलेली नवीन देशी दारू चिल्लर विक्री दुकानासाठीचे ना हरकत प्रमाणपत्र यासंदर्भात सभागृहात चर्चा घडवून ती एनओसी रद्द करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. त्यासंदर्भात शिवसेनेकडून नगराध्यक्षांना निवेदन देण्यात आले आहे. २९ मार्च २०१७ ला राळेगाव नगर पंचायत हद्दीत नवीन देशी दारू दुकानांना ना हरकत प्रमाणपत्र परवानगी देण्यात येऊ नये असा ठराव पारित करण्यात आला होता. या ठरावाचे सूचक माजी नगरसेविका छाया पिंपरे तर अनुमोदन शिवसेना माजी नगरसेविका मीना शंकर गायधने होते. मात्र प्रशासक काळात तत्कालीन मुख्याधिकारी अरुण मोकळ यांनी आपल्या सेवेच्या अंतिम दिनी उषा शेट्टी रा. नवी मुंबई ठाणे यांना व्यवसायासंबंधी पत्रात कोणताही उल्लेख नसताना प्रभाग क्रमांक ६ मध्ये नवीन देशी दारूचे चिल्लर विक्री दुकानासाठी दिनांक ९ सप्टेंबर २०२१ ला ना हरकत प्रमाणपत्र दिले. या प्रकाराबाबत विद्यमान शिवसेना नगरसेविका सिमरन इम्रान पठाण यांनी सर्व कागदपत्राच्या पुराव्यानिशी हा विषय सर्वसाधारण सभेत घेण्यास नगराध्यक्षांना पत्राद्वारे विनंती केली. परंतु ज्येष्ठ सदस्यांनी विषयाला बगल देत दिनांक ७ जुन २०२२ च्या सर्वसाधारण सभेत विषय पत्रिकेच्या विषय क्रमांक ९ वर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पत्रावर चर्चा करणे हा विषय ठेवण्यात आला तत्कालीन मुख्याधिकारी अरुण देवचंद मोकळ यांच्याकडून प्रशासक काळात अर्थपूर्ण दिल्या गेलेली नवीन देशी दारूचे चिल्लर विक्री दुकानासाठी एनओसी व नगरपंचायतमध्ये राळेगाव नगर पंचायत हद्दीत नवीन देशी दारू चिल्लर विक्रीची दुकानांना ना हरकत परवानगी देण्यात येऊ नये असा ठराव यावर सर्वसाधारण सभेत चर्चा होणे अपेक्षित आहे. राळेगाव शहरात वाढणाऱ्या देशी दारू चिल्लर विक्री दुकानामुळे परिसरात भविष्यात अनेक गरीब कुटुंबांची राखरांगोळी होण्याचा धोका आहे. तरी सर्व नगरसेवकांनी या नवीन देशी दारू च्या चिल्लर विक्री दुकानाच्या एन ओ सी वर फेरविचार करून प्रशासन काळात दिल्या गेलेल्या एनओसी चर्चा घडवून दोषी अधिकारी कर्मचाऱ्यावर कार्यवाही करावी. असे निवेदन नगराध्यक्षांना देण्यात आले .
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.