आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृत्यू:कारचे टायर फुटले, वृद्धाचा मृत्यू

यवतमाळ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भरधाव कारचा अचानक टायर फुटल्याने कारमधील एका वृद्धाचा जागीच मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला. ही घटना यवतमाळ ते नागपूर मार्गावर असलेल्या भारी विमानतळ परिसरात गुरुवार, १ डिसेंबरला सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास घडली. बाबाराव ग्यानबाजी रावते (८४) रा. ईजनी ता. महागाव असे मृताचे नाव असून, दत्तात्रय डाखोरे (७८) रा. गोकुळ ता. माहूर असे जखमीचे नाव आहे.

या प्रकरणी पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनूसार, आर्णी शहरातील विलास राऊत यांचे नातेवाईक बाबाराव रावते यांच्यासोबत दत्तात्रय डाखोरे चारचाकी वाहन क्रमांक एमएच-२९-एडी-३९३७ ने नातू आणि नातसुनेला नागपुर येथे सोडायला गेले होते. दरम्यान गुरुवारी सकाळी नागपूर येथून परत येत असतांना यवतमाळ ते नागपूर मार्गावरील भारी विमानतळाजवळ चालक सचिन खोब्रागडे याने वाहन भरधाव व निष्काळजीपणाने चालवल्यामुळे वाहनाचा टायर फुटला. या अपघातात वाहनातील बाबाराव रावते यांचा जागीच मृत्यू झाला तर दत्तात्रय डाखोरे जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. याप्रकरणी शहर पोलिसांत चालकाविरोधात विविध कलमान्वये गुन्हे नोंद करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास शहर ठाणेदार नंदकुमार पंत करीत आहे

बातम्या आणखी आहेत...