आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघाती मृत्‍यू:कारचे टायर फुटले, वृद्धाचा मृत्यू

यवतमाळ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भरधाव कारचे अचानक टायर फुटल्याने कारमधील एका वृद्धाचा जागीच मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला. ही घटना यवतमाळ ते नागपूर मार्गावर असलेल्या भारी विमानतळ परिसरात गुरुवार, १ डिसेंबरला सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास घडली. बाबाराव ग्यानबाजी रावते (८४ रा. ईजनी ता. महागाव) असे मृताचे नाव असून, दत्तात्रय डाखोरे (७८ रा. गोकुळ ता. माहूर )असे जखमीचे नाव आहे. आर्णी शहरातील विलास राऊत यांचे नातेवाईक बाबाराव रावते यांच्यासोबत दत्तात्रय डाखोरे चारचाकीने नातू आणि नातसुनेला नागपूर येथे सोडायला गेले होते. दरम्यान, गुरुवारी सकाळी नागपूर येथून परत येत असताना यवतमाळ ते नागपूर मार्गावरील भारी विमानतळाजवळ चालक सचिन खोब्रागडे याने वाहन भरधाव व निष्काळजीपणाने चालवल्यामुळे वाहनाचा टायर फुटला. या अपघातात वाहनातील बाबाराव रावते यांचा जागीच मृत्यू झाला तर दत्तात्रय डाखोरे जखमी झाले आहेत.

बातम्या आणखी आहेत...