आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

17 संशयितांना‎ न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली:अट्रावल दंगलप्रकरणी 205 जणांविरुद्ध गुन्हा

यावल2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील अट्रावल येथील दंगलप्रकरणी यावल पोलिस ठाण्यात ४ वेगवेगळ्या फिर्यादीनुसार‎ २०५ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. यात ५१ जणांविरुद्ध ॲट्रॉसिटी, ५७ जणांविरुद्ध‎ दंगल, ९३ जणांविरुद्ध शासकीय कामात अडथळा, तर चौघांविरुद्ध आर्मअॅक्टच्या गुन्ह्याचा‎ समावेश आहे. यापैकी ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यातील ९ व इतर गुन्ह्यातील ८ अशा १७ संशयितांना‎ न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे.‎

अट्रावल येथे शनिवारी दंगल झाली होती. यात दिवाकर तायडे‎ यांच्या फिर्यादीवरून ५१ आणि इतर २५ अज्ञात व्यक्तींविरुद्ध ॲट्रॉसिटीसह विविध कलमान्वये गुन्हा‎ दाखल झाला. यापैकी अॅट्रॉसिटीचा गुन्ह्यातील ९ जणांना भुसावळ न्यायालयाने ६ एप्रिलपर्यंत ५ दिवसांची कोठडी दिली. तपास डीवायएसपी डॉ. कुणाल सोनवणे करत आहे.‎ दुसऱ्या प्रकरणात विजय प्रभाकर कोळी यांच्या फिर्यादीवरून ५७ अज्ञात व २५ अज्ञात‎ संशयितांविरुद्ध दंगलीसह विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.